चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतील पैशांची पिशवी लंपास केली साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : शहरातील बुलढाणा रोडवरील एका हॉटेलवर नाश्ता करण्यासाठी थांबला असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली साडेचार लाखांची रोकड लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मलकापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली महिती अशी की, दाताळा येथील दीपक सुभाष किन्ने यांनी आपल्या मित्राला घर बांधण्यासाठी ८ लाख ५० हजार रुपये दिले होते. त्यापैकी ४ लाख ५० हजार रुपये घेऊन तो मित्र दाताळ्याकडे परत येत होता. दरम्यान, बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका हॉटेलवर तो नाश्ता करण्यासाठी थांबला. याची संधी साधत अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतील पैशांची पिशवी लंपास केली. घटनेनंतर…
Author: saimat
माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजीत उपक्रम साईमत/ चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील हातेड बु, हातेड खु. व गलवाडे येथील जिल्हा परिषद शाळेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना घरुन शुध्द व थंड पिण्याचे पाणी आणता यावे याकरिता पाण्याच्या बाटल्या वितरीत करण्यात आल्या. सदर उपक्रम माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वप्रथम महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेस पुष्पाजंली अर्पण करण्यात आली. तसेच रंगोत्सव ह्या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना चालना मिळावी ह्या उद्देशाने राष्ट्रीय पातळीवरच्या आयोजित स्पर्धेत यश प्राप्त विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र तसेच शाळेस मिळालेल्या चषक प्रदान करण्यात आले. याप्रसंगी…
५० हजारासह संसारोपयोगी वस्तू खाक साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील चावलखेडे येथील शोभाबाई दिलीप अहिरे यांच्या बेघर वस्तीतील झोपडीला अचानक आग लागल्याने आगीत ५० हजार रुपयांसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून पार्टिशनच्या कच्च्या झोपडीत राहणाऱ्या शोभाबाई अहिरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य आणि कष्टाने जमवलेले रोख ५० हजार रुपये या आगीत जळून खाक झाले आहेत. त्यांना बचत गटातून ७० हजार रुपयांचे कर्ज मिळाले होते, त्यातील २० हजार रुपये खर्च झाले होते आणि उर्वरित ५० हजार रुपये घरात ठेवलेले होते, जे जळून गेले. शोभाबाई या मोलमजुरी करून आपली गुजराण करतात. त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
स्वामी नारायण मंदीर परिसरात अज्ञात चोरट्याने वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन साईमत/फैजपूर/प्रतिनिधी : येथील स्वामी नारायण मंदीर परिसरात अज्ञात चोरट्याने वृध्द महिलेच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची चैन जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शारदा प्रदिप चौधरी (वय ६४ रा. लक्ष्मीनगर, जळगाव) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता शारदा चौधरी स्वामी नारायण मंदीरासमोर पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात २ भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची १ लाख ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन लांबविली. दरम्यान ही…
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांचे महत्त्व केले. साईमत/यावल/प्रतिनिधी : तालुक्यातील नायगाव येथील सातपुडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून लेझीम संच भेट देण्यात आला. पारंपरिक क्रीडा आणि सांस्कृतिक वारसा जपणे,विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि एकात्मता वाढविणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, रुपेश तेली, पंकज कोळी उपस्थित होते. लेझीम स्विकारताना शाळेचे मुख्याध्यापक योगराज नायडे, उपशिक्षक विकास सूर्यवंशी, पी.व्ही.बोबडे, मनोज मोरे, श्री.तडवी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळांचे महत्त्व, शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायामाची गरज आणि संस्कृती जपण्याचे मूल्य याबद्दल मार्गदर्शन…
एक माणुसकीचा धर्म जोपासण्याचे कार्य केले. साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांची निकड लक्षात घेता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी शहरातील उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीब, बेसहारा व्यक्तींना स्वेटर, टोपी, मफलर देवून एक माणुसकीचा धर्म जोपासण्याचे कार्य केले. मलकापूर शहरात मागील काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला असून उघड्यावर राहणाऱ्या गोरगरीब, बेघर आणि निराधार लोकांचे हाल अधिकच होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत त्यांना उबदार कपड्यांची निकड ओळखून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी स्वतः पुढाकार घेत शहरातील विविध भागात जाऊन गरजूंपर्यंत स्वेटर, टोपी आणि मफलर वाटप केले. थंडीच्या लाटेत थरथरणाऱ्या व्यक्तींना उबदार कपडे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव…
आजी-माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला. साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील अनुराबाद येथील मराठी शाळेमध्ये ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आजी आणि माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात भारतीय सैन्यात कार्यरत असलेले गावाचे सुपुत्र रामेश्वर चव्हाण तसेच माजी सैनिक प्रकाश उमाळे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आपल्या गावातील युवक देशसेवेत कार्यरत असल्याचा अभिमान व्यक्त करत सरपंच ज्ञानदेव एकनाथ ढगे यांनी सैनिकांचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला उपसरपंच निलेश फिरके, ग्रामपंचायत सदस्य संजय बोराडे, नरसिंग चव्हाण, विश्वनाथ नेमाने, रामा फिरके, शंकर क्षिरसागर, प्रसन्न कोलते, ग्रामविकास अधिकारी…
क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिकसह विविध कार्यक्रम साईमत/पारोळा/प्रतिनिधी : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारोळा येथील विविध शाळांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक शहरातील महामार्गालगत असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त समितीतर्फे मान्यवरांनी प्रतिमेला पुष्पहार न आणता एक वही व एक पेन आणावे. व ते साहित्य संकलन करून गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येईल, असा आगळावेगळा उपक्रम राबविला. यावेळी शिक्षक राहुल सूर्यवंशी यांनी १२ वह्या, १० पेन्सिल व १ पेन पॉकेट भेट दिले. त्याचबरोबर जवळपास ३० ते ३५ जणांनीही वही, पेन, साहित्य, वस्तू भेट दिली. आयोजकांनी एका वहीत भेट देणाऱ्यांचा…
सोना पेट्रोल पंपासमोरील अंबिका गॅरेजमध्ये काल रात्री अचानक भीषण आग साईमत/ जामनेर /प्रतिनिधी : शहरातील सोना पेट्रोल पंपासमोरील अंबिका गॅरेजमध्ये काल रात्री अचानक भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, जामनेर नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि स्थानिक तरुणांच्या मदतीने आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आले. परिणामी, शेजारील आस्थापनांमध्ये आग पसरण्याचा मोठा अनर्थ टळला आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीने अवघ्या काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. गॅरेजमध्ये ठेवलेले वाहनांचे पार्टस्, ऑईल (तेलकट माल) आणि इतर ज्वलनशील साहित्य यामुळे आगीच्या उंच ज्वाळा आकाशात झेपावत होत्या. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, दुकानाचे शटर वितळून खाली पडले. आगीच्या धुराचे…
पिताश्री कै.कथ्थू चुणिलाल शिंपी यांच्या पुण्यस्मरणार्थ उबदार उलन ब्लँकेट भेट देवून मायेची ऊब दिली. साईमत/पारोळा /प्रतिनिधी : कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून पारोळा येथील जि.प.प्राथमिक शाळा क्र.३ च्या ३६ गरजू बालक विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांच्या विनंतीने व्यापारी अनिल शिंपी यांनी आपले पिताश्री कै.कथ्थू चुणिलाल शिंपी यांच्या पुण्यस्मरणार्थ उबदार उलन ब्लँकेट भेट देवून मायेची ऊब दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव शिवदास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून दिपक कोळपकर, किशोर सोनवणे, माधवराव कथ्थू शिंपी, डॉ.गौरव पाटील, मालती शिंपी, दाते अनिल कथ्थू शिंपी व त्यांच्या धर्मपत्नी वैशाली शिंपी आदी उपस्थित होते.यावेळी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र माधवराव शिंपी यांनी वडिलांच्या स्मृतींना…