Author: saimat

नाभिक समाज दुकानदार संघटनेतर्फे धरणगाव तहसीलदार  यांना व पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला साईमत/धरणगाव/प्रतिनिधी :   नाशिक जिल्ह्यातील खमताने येथील बालिकेवर सत्तर वर्षीय म्हाताऱ्याने अत्याचार केल्याप्रकरणी धरणगाव नाभिक समाज दुकानदार संघटनेतर्फे धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना व पोलिस अधिकारी यांना सर्व दुकानदार बांधवांतर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे व पीडित कुटुंबास न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना समाजात घडू नयेत, यासाठी शासनाने आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी नाभिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीश बोरसे, उपाध्यक्ष गणेश झुंजारराव, सचिव दिगंबर…

Read More

मुलींचा ऐतिहासिक विजय साईमत/ मलकापूर /प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, जिल्हा क्रीडा परिषद वर्धा तसेच वर्धा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित केलेल्या शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथील १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथमच ऐतिहासिक यश संपादन करत अमरावती विभागाचे, शाळेचे तसेच जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत यशोधामच्या मुलींच्या संघाने जिद्द, शिस्त, संघभावना आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपला ठसा उमटवला. हा विजय केवळ एक स्पर्धात्मक यश नसून यशोधाम पब्लिक स्कूलच्या दर्जेदार क्रीडा…

Read More

सोपान गव्हांडे यांच्या पाठपुराव्याला यश साईमत/ सोयगाव /प्रतिनिधी :   गेल्या १३ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले सोयगाव तालुक्यातील घोसला येथील आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू होण्यास प्रारंभ झाला असून, त्यामुळे घोसला व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांचे सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवेदने आणि प्रशासनाशी केलेल्या संवादामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.घोसला येथील आरोग्य उपकेंद्र माजी सरपंच प्रकाश नारायण गव्हांडे तसेच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व सध्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आबासाहेब काळे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले होते. त्यावेळी सोयगाव तालुक्यात पाच ते सहा आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी मिळाली होती. मात्र, विविध कारणांमुळे घोसला येथील उपकेंद्र अनेक वर्षे बंदच राहिले. परिणामी,…

Read More

नानासाहेब खोले यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात शाळेस भेट दिली. साईमत/भुसावळ /प्रतिनिधी :    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द (ता.यावल) येथे मुथा फाऊंडेशनचे मूल्यवर्धन राज्य प्रशिक्षक व समन्वयक नानासाहेब खोले यांनी मूल्यवर्धन उपक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात शाळेस भेट दिली. त्यांच्या समवेत यावल तालुका मूल्यवर्धन समन्वयक रवींद्र पाटील तसेच रावेर तालुका मूल्यवर्धन समन्वयक श्री.खपली उपस्थित होते. सकाळी परिपाठापासूनच श्री.खोले शाळेत उपस्थित राहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तर उपशिक्षिका जयश्री काळवीट यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर राज्यस्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण (एसआरजी) प्राप्त शिक्षिका जयश्री काळवीट यांनी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी “माझ्या भावना” हा मूल्यवर्धन उपक्रम राबविला. या उपक्रमाचे…

Read More

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात साईमत/सावदा, ता.रावेर/प्रतिनिधी :    सावदा येथील नगरपालिका संचलित आ.गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे दि. १४ डिसेंबर रोजी १९७१-७२ मध्ये जुनी एस.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल ५३ वर्षांनंतर सुमारे ७५ माजी विद्यार्थी मित्र पुन्हा एकत्र आल्याने शाळा परिसरात आनंद, आपुलकी व आठवणींचे वातावरण निर्माण झाले होते. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात बेंचवर बसून बालपणातील व शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले. शाळेतील खोड्या, अभ्यासाचे दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन व त्या काळातील अनुभव कथन करताना अनेक क्षण भावूक करणारे ठरले. या ऐतिहासिक स्नेहमेळाव्यासाठी कोचूर…

Read More

एजन्सी स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :   नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील दसरखेड टोल प्लाझावर वाढत्या धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी विशेष वाहतूक सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला. टोल प्लाझाची संकलन एजन्सी स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आज रविवार, दि. १५ डिसेंबर रोजी वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांवर तसेच रस्त्यावरील डिव्हायडरवर रेडियम स्टिकर व आवश्यक सुरक्षा चिन्हे लावण्यात आली. धुक्याच्या परिस्थितीत वाहनांची दृश्यमानता वाढून अपघातांचा धोका कमी व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक भुषण बागुल…

Read More

येवलेवाडी परिसरात बोपदेव घाटाच्या पायथ्याशी लॉजवर कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला  साईमत/ पुणे/न्युज नेटवर्क/:    येवलेवाडी परिसरात बोपदेव घाटाच्या पायथ्याशी लॉजवर राजरोस सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पश्चिम बंगालमधील दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली लॉज मालकासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. येवलेवाडी – सासवड रोडवर बोपदेव घाट परिसरात ‘हॉटेल साई बालाजी लॉजिंग’ नावाचे लॉज आहे. लॉजचा मालक रवी छोटे गौडा (४६) आणि तेथे काम करणारा सचिन काळे (४०) हे दोघे मिळून आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील मुलींना वेश्याव्यवसायात ढकलत होते. बाहेरून हे सामान्य लॉज वाटत असले तरी, आत्र हा अवैध धंदा जोरात सुरू होता. कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर…

Read More

तालुका पोलिसात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल, एकाला अटक साईमत/जळगाव/प्रतिनिधी :    शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील निमखेडी शिवारात एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या तीव्र वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय-३०) या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना रविवारी, १४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, मयत सागर सोनवणे हा आपल्या आई-वडील आणि भावासोबत याच परिसरात वास्तव्याला होता. गेल्या जवळपास चार वर्षांपासून सागरचे परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे कुटुंबात आणि…

Read More

५३७ प्रकरणांचा निपटारा; १७ लाखांपेक्षा अधिक रकमेची वसुली साईमत/बोदवड/ प्रतिनिधी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत ५३७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तर १७ लाख ३५७ रुपये इतकी वसुलीही झाली. यामुळे पक्षकारांना त्वरित न्याय मिळाला तसेच न्यायालयावरचा कामाचा ताण कमी झाला. तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना लोक अदालतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, लोक अदालत खऱ्या अर्थाने ‘जन अदालत’ ठरली आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रकरणांमुळे होणारा मानसिक त्रास व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ही सर्वोत्तम आणि एकमेव व्यवस्था आहे. लोक अदालत त्वरित न्याय देऊन दुभंगलेली मने जोडते. वाद मिटवा आणि आयुष्यात पुढे चला. लोक…

Read More

महिला अपराध नियंत्रण शाखेच्यावतीने ‘मानव अधिकार दिवस’ उत्साहात  साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :  येथे प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आणि महिला अपराध नियंत्रण शाखेच्या वतीने ‘मानव अधिकार दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक मानव अधिकार दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमात संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. जे श्रीमंत असो की गरीब, सर्वांना समान आहेत. मतदानाचा अधिकार, धर्मनिरपेक्ष सन्मान, शिक्षणाचा अधिकार हे सर्व संविधानामुळे सुनिश्चित आहेत. म्हणूनच मानव अधिकार दिनाचे औचित्य अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. माजी विस्तार अधिकारी राजकुमार जैन…

Read More