महानगरपालिकेत मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा विशेष आढावा साईमत -जळगाव- प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव शहरात ३० जून ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम राबवला जात आहे. या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवण्यासाठी मंगळवारी (२१ जुलै) जळगाव शहर महानगरपालिका सभागृहात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (१३-जळगाव शहर) यांच्यातर्फे आयोजित या बैठकीस महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्चना मोरे, प्रांताधिकारी विनय गोसावी, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.…
Author: Bharati Bharsake
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | देशात धार्मिक अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले, मॉब लिंचिंगच्या घटना आणि संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यावरील आक्रमणाविरोधात आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हे धरणे आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शाकीर शेख यांच्या नेतृत्वात पार पडले. आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. या १२ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन वक्फ सुधारणा: वक्फ…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहरातील दीक्षित वाडी परिसरातील मुख्य रस्त्यावरून आत जाणाऱ्या मार्गावरील मंजूर कल्व्हर्टचे (मोरीचे) काम प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे या रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून नागरिक व प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. परिणामी दररोज दुचाकी तसेच चारचाकी वाहने खड्ड्यांत अडकून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या बिकट परिस्थितीमुळे दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ”जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी कल्व्हर्टचे काम प्रशासनाकडून मंजूर झाले…
साईमत -फैजपूर – प्रतिनिधी | भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचा भक्तिभाव आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात आषाढी एकादशीनिमित्त अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दिंडी-पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फैजपूर येथील वै. दिगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे यांचे सुपुत्र विक्रांत नारखेडे यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. जर्मनीत वास्तव्यास असलेल्या भारतीय भाविकांना एकत्र आणून हा सोहळा साकारण्यात आला असून, परदेशातील भारतीय समुदायात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. पालखी सोहळा व हरिपाठ : दिंडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांची पालखी काढण्यात आली आहे. सप्ताहभर धार्मिक कार्यक्रम : या…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव येथील नवीन बस स्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने एका महिलेचे ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील रहिवासी सुवर्णा अजय भोसले (वय ५२, रा. कळवा, जि. ठाणे) या खाजगी नोकरी करतात. त्या १८ जुलै रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास जळगाव येथील नवीन बसस्थानकावरून जळगाव ते चाळीसगाव प्रवास करण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने सुवर्णा भोसले यांच्या गळ्यातील आणि पर्समधील सोन्याचे…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | फरार आरोपींचा बंदोबस्त आणि अवैध शस्त्रनिर्मितीच्या मुळावर घाव घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मध्य प्रदेशातील गुन्हेगारांच्या सुरक्षित आश्रयस्थानावर धडक कारवाई केली आहे. जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे पहाटेच्या सुमारास ‘ऑपरेशन कॉम्बिंग सर्च’ राबवून अवैध शस्त्रास्त्रांचा मोठा साठा, दारूगोळा आणि ३२ संशयित वाहने जप्त केली आहेत. पहाटे ४ वाजता ४०० पोलिसांचा वेढा चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिकच्या पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यांतील संशयित पार उमरटी परिसरात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगाव पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम तीव्र केली असून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मुक्ताईनगर रस्त्यावर मोठी कारवाई केली आहे. कारमधून होणारी प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक उघडकीस आणत १२ लाख ०६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना गुटखा वाहतुकीची गोपनीय बातमी मिळाली होती. मारुती सुझुकी अर्टिगा कार (क्रमांक MH-30 AZ-4664) मधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समजताच मुक्ताईनगर रस्त्यावर एलसीबीच्या पथकाने सापळा…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनाला जळगावातून जोरदार पाठिंबा मिळाला आहे. आज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जागरूक नागरिकांच्या वतीने सकाळी १२ ते दुपारी १ या वेळेत शांततापूर्ण मात्र अत्यंत प्रभावी निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये विद्यार्थी, तरुण, महिला, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न हाताळण्यात आलेल्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. ‘विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’च्या…
जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली स्व. अजित पवारांची प्रतिमा; सर्व कार्यालयांत अभिवादन करण्याचे निवेदन साईमत -जळगाव- प्रतिनिधी | राज्य शासनाने २०२६ पासून स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय जयंतीच्या यादीत समावेश केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २२ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्व. अजितदादांची जयंती साजरी करून त्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (रावेर लोकसभा जिल्हा) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्व. अजित पवार यांची प्रतिमा भेट दिली. शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यात प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तसेच सर्व सरकारी यंत्रणांमध्ये या…
साईमत -चोपडा – प्रतिनिधी | चोपडा शहरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत एकूण १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गट क्रमांक ३७, प्लॉट क्रमांक २९ मधील रहिवासी पवनकुमार रंजित राजपूत (वय ३२) हे आपल्या घराला व्यवस्थित कुलूप लावून काही कामा निमित्त बाहेर गेले होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधली आणि घराचे मुख्य कडी-कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाची उचकापाचक करून रोख रक्कम:…