जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली स्व. अजित पवारांची प्रतिमा; सर्व कार्यालयांत अभिवादन करण्याचे निवेदन
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
राज्य शासनाने २०२६ पासून स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय जयंतीच्या यादीत समावेश केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २२ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये स्व. अजितदादांची जयंती साजरी करून त्यांच्या स्मृतींना शासकीय मानवंदना देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (रावेर लोकसभा जिल्हा) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्व. अजित पवार यांची प्रतिमा भेट दिली. शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यात प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तसेच सर्व सरकारी यंत्रणांमध्ये या दिवशी अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित केले जावेत, असा आग्रह या निवेदनातून धरण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात:
उमेश नेमाडे (जिल्हाध्यक्ष)
विवेक ठाकरे (जिल्हा सरचिटणीस)
राकेश सोनार (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)
अतुल चव्हाण (युवक तालुकाध्यक्ष)
निलेश कोलते (नगरसेवक)
ॲड. देवकांत पाटील
या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
