Author: Bharati Bharsake

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | एखाद्या मुलाच्या हातात मातीचा छोटासा गोळा असतो, पण त्या गोळ्यात दडलेले असते उद्याचे हिरवेगार जंगल! हाच अनोखा संदेश देत अनुभूती बालनिकेतन मॉन्टेसरी व अनुभूती विद्या निकेतन येथे दि. १३ ते १८ जुलै दरम्यान “अनुभूती ट्री फेस्टिव्हल” अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक पद्धतीने हजारो सीड बॉल (बीजगोळे) तयार करत पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि प्रभावी संदेश दिला आहे. ​जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व अंबिका जैन यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून व संकल्पनेतून हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. प्राचार्य मनोज परमार यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी…

Read More

साईमत -जळगाव- प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) जळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचा सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. आज भगवान जगन्नाथ महाराजांचे भव्य दर्शन आणि महाआरतीचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. ​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य आरती आणि रॅलीची (रथयात्रा) सुरुवात राजू मामा भोळे आणि डॉ. अमित भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आली. राजू मामा भोळे यांच्या हस्ते भगवान जगन्नाथ महाराजांची विधीवत महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर रथयात्रेला हिरवा कंदील दाखवून सुरुवात झाली. ​परदेशी भक्तांचा सहभाग आणि हरिनामाचा गजर ​यंदाच्या रथयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्थानिक भाविकांसह इस्कॉनचे परदेशी भक्त मोठ्या संख्येने सहभागी…

Read More

नवी दिल्ली दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलन आता कमालीचे तापले आहे. एकीकडे उपोषणावर बसलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केल्याने खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सोनम वांगचुक यांचा वैद्यकीय अहवाल प्रशासनाकडून लपवला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. ​उपोषणाला बसताच अभिजित दिपकेंवर शाईफेक; ५००-५०० रुपये देऊन गुंड घुसवल्याचा आरोप ​प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर, त्यांच्या समर्थनासाठी जंतर-मंतरवर आमरण उपोषणाला बसलेले सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाईफेक केली. शाईफेकीनंतर आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला आणि उपस्थित समर्थकांनी तात्काळ त्या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.…

Read More

​नवी दिल्ली दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून उपोषणावर बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना शनिवारी (१८ जुलै) सकाळी दिल्ली पोलिसांनी बळजबरीने आंदोलनस्थळावरून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. ​पत्नी गीतांजली जे. आंगमो यांचे प्रशासनाला खडेबोल ​सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच त्यांची पत्नी गीतांजली जे. आंगमो तात्काळ सफदरजंग रुग्णालयात पोहोचल्या. या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ​”मी सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आहे, जिथे सोनम वांगचुक यांना दाखल करण्यात आले आहे. माझी,…

Read More

​”अटक केली तरी आंदोलन थांबणार नाही; संसदेचे अधिवेशन याच विषयाने गाजणार!” ​जळगाव/नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर ‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेतल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली आणि अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही त्यांना अटक केली तरीही हे आंदोलन चालूच राहणार,” अशा शब्दांत शरद पवारांनी केंद्र सरकारला सुनावले असून, आगामी संसदेच्या अधिवेशनात यावरून मोठा गदारोळ होणार असल्याचा इशारा दिला आहे. ​सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करत शरद पवार म्हणाले: ​”गेल्या पाच-सहा दिवसांपासून…

Read More

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे मोठे यश साईमत -जळगाव- प्रतिनिधी | सतत होणारी तीव्र डोकेदुखी आणि नाक-कानातून सतत वाहणारा पाण्यासारखा द्रव… सुरुवातीला साधी सर्दी समजून उपचार घेणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणीला जळगावातील डॉक्टरांनी नवजीवन दिले आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील नाक-कान-घसा (ENT) तज्ज्ञांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि नाजूक शस्त्रक्रियेद्वारे तरुणीच्या मेंदूतील पाण्याची गळती थांबवण्यात यश मिळवले आहे. ​तपासणीअंती या तरुणीला ‘सीएसएफ ओटोरिया विथ रायनोरिया’ (CSF Otorrhea with Rhinorrhea) हा अत्यंत दुर्मीळ आजार असल्याचे निदान झाले होते. या आजारामुळे मेंदूभोवती असलेले पाणी (Cerebrospinal Fluid) नाक आणि कानावाटे बाहेर वाहत होते. ​साधी सर्दी समजण्याची झाली चूक! ​संबंधित ३५ वर्षीय तरुणीला…

Read More

शाश्वत आणि विषमुक्त शेतीसाठी ‘पशुधन’ ठरणार संजीवनी! ​ साईमत -जळगाव- प्रतिनिधी | “पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. हवामान बदल आणि शेतीसमोरील वाढती आव्हाने पाहता, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत जळगाव जिल्हा राज्यात नंबर वन ठरवण्यासाठी पात्र पशुपालकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे यावे,” असे आक्रमक आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी केले. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. ​राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या व्यापक जनजागृतीसाठी पशुसंवर्धन विभाग आणि ‘कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन’ (CCIF) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवारी (१६ जुलै) भव्य…

Read More

​अभिजीत दीपके आजपासून आमरण उपोषणावर; २० जुलैला संसदेवर धडकणार मोर्चा ​ ​नवी दिल्ली दिल्लीच्या जंतर-मंतरवर पेपर लीक प्रकरणाविरोधात सुरू असलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांचे आमरण उपोषण दिल्ली पोलिसांनी अखेर मोडून काढले आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाचा दाखला देत पोलिसांनी आज सकाळी वांगचूक यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. या कारवाईमुळे आंदोलन स्थळी प्रचंड गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर, वांगचूक यांचे सहकारी आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. ​ ​सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाची धुरा सांभाळत अभिजीत दीपके यांनी थेट केंद्र सरकार आणि प्रशासनाला आव्हान दिले आहे: १)…

Read More

​काम आटपून घरी परतताना काळाचा घाला ​ ​जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी सायंकाळी रेमंड चौफुली जवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेखर ईश्वर सपकाळे (वय २५, रा. धामणगाव, ता. जळगाव) आणि पीयुष प्रदीप बेंडाळे (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) अशी जखमींची नावे आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, शेखर आणि पीयुष हे दोघे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला आहेत. शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कंपनीतील काम आटपून ते दुचाकीने आपल्या घराकडे निघाले होते. याच…

Read More

तापी नदीपात्र आणि राजाभोये नाल्यातील अवैध हातभट्ट्या उद्ध्वस्त; दोन आरोपींवर गुन्हे दाखल साईमत -फैजपूर – प्रतिनिधी | फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दारू माफियांविरोधात पोलिसांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलिसांनी सलग दोन दिवस धडक मोहीम राबवून कासवा व पाडळसा शिवारात दोन मोठे छापे टाकले. या धडक कारवाईत हजारो रुपयांचे कच्चे रसायन, तयार गावठी दारू आणि हातभट्टीचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले असून, दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ​पहिली कारवाई: कासवा शिवारात तापी नदीपात्रात धाड ​दि. १६ जुलै रोजी पहाटे ६:३० वाजेच्या सुमारास मौजे कासवा (ता. यावल) येथील तापी नदीपात्रात अवैध…

Read More