साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहरातील इच्छादेवी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ‘फेमस ट्रेडर्स’ दुकानासमोर आज एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. श्याम सुभाष तांबेश्वर (रा. तांबापूर, जळगाव) असे मृत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौकातील महामार्गावर श्याम तांबेश्वर हा तरुण पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला तत्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घातपाताचा गंभीर आरोप हा अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप मयत श्याम तांबेश्वर…
Author: Bharati Bharsake
मुंबई/दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आणि पोलिसांमध्ये झालेल्या मध्यरात्रीच्या झटापटीनंतर देशभरात आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. विरोधकांसह अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असतानाच, आता या राजकीय वादात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा फडणवीस हिने उडी घेतली आहे. “सोशल मीडियावरील ट्रेंडला आंधळेपणाने पाठिंबा देऊ नका आणि केवळ ट्रेंड आहे म्हणून बंड करू नका,” असा रोकठोक सल्ला दिविजा फडणवीस यांनी तरुणांना दिला आहे. जंतर-मंतरवरील झटापट : २० जुलै रोजी दिल्लीच्या जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. देशभर पडसाद : या घटनेनंतर तरुणांचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून विरोधी पक्षांनी या आंदोलनाला उघड…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | भुसावळ : सोलर सिस्टीमची मंजुरी आणि रिलिज ऑर्डर देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. नितीन अभिमन्यू पाटील (वय ४५) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, या धडक कारवाईमुळे महावितरण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोलर सिस्टीमची मंजुरी : तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर सोलर सिस्टीम बसवण्याची प्रक्रिया सुरू होती. दरडोई १ हजारांची मागणी : संबंधित दोन ग्राहकांच्या सोलर सिस्टीमची मंजुरी आणि रिलिज ऑर्डर देण्यासाठी नितीन पाटील याने प्रत्येकी १ हजार रुपयेप्रमाणे एकूण २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक…
आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात प्रतिमापूजन; श्रीराम विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप साईमत -जळगाव- प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पक्षाच्या आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा कार्यालयात जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रमोद पाटील व महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक भान जपत परिसरात तब्बल २१ वृक्षांची लागवड केली. जयंतीचे औचित्य साधून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.…
न्यू इंग्लिश स्कूल परिसरातील न्यू प्लॉट एरियामध्ये चिखलाचे साम्राज्य; अपघातांचे सत्र सुरु, नगरपरिषदेला आंदोलनाचा इशारा! साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी | नशिराबाद शहरातील गणेशनगर आणि दत्तनगर परिसरातील न्यू इंग्लिश स्कूलजवळील न्यू प्लॉट एरियात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसावा लागत आहे. ‘अमृत योजने’अंतर्गत करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ता पूर्ववत दुरुस्त न केल्यामुळे परिसरात खड्ड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या संदर्भात नगरपरिषदेला वारंवार विनंती करूनही प्रशासनाने डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधल्याने, स्थानिक रहिवासी देवेंद्र भंगाळे यांनी नशिराबाद नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना ‘स्मरणपत्र’ पाठवून थेट इशारा दिला आहे. निवेदनानुसार, या गंभीर समस्येबाबत सुमारे २० दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडे लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाला या त्रासाची…
नवी दिल्ली ‘नीट’ (NEET) पेपरफुटी आणि इतर शिक्षणविषयक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वांगचुक यांना गुरुग्राम येथील खासगी ‘मेडांता’ रुग्णालयात हलवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी पार पडली. नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत आंदोलक आणि तरुण प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना प्रशासनाने उचलून थेट सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. उपोषण सुरू…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जमिनीच्या क्षुल्लक वादातून सख्या पुतण्याने काकाचा लाकडी काठीने डोक्यात वार करून निघृण खून केला. एवढेच नव्हे तर खुनाला अपघाताचे रूप देण्यासाठी मृतदेह नाल्याकाठी फेकून दिला. मात्र, रावेर पोलिसांनी आपल्या कौशल्याने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच या खुनाचा पर्दाफाश करत आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत. रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गारखेडा (ता. रावेर) येथे २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या परिसरात रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता रामा बारेला यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत…
साईमत -नशिराबाद – प्रतिनिधी | चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवून एका १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेला चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुनील सावके (सुपरवायझर, गोदावरी हॉस्पिटल कॅम्पस) याने पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चिकू खाऊ घालण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला जवळच असलेल्या चिकूच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने तात्काळ नशिराबाद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून संशयित सुनील सावके…
साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी | मुंबई येथील डॉ. दिलीप चौधरी यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९८५ मधील पडीक शेतात ही मानवी कवटी आढळून आली. याबाबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा नगरसेवक लालचंद पाटील यांनी नशिराबाद पोलिसांना तातडीने माहिती दिली. बातमी समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. इतर अवशेष नाही; पोलिसांकडून संपूर्ण परिसराची कसून पाहणी घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांनी मानवी कवटी ताब्यात घेतली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण शेतात कसून शोधमोहीम राबवली. कवटीव्यतिरिक्त इतर कोणतेही मानवी अवशेष, हाडे किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. वैज्ञानिक तपासासाठी कवटीचे नमुने नाशिक व धुळे येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत (FSL) पाठवण्यात आले आहेत.…
सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरू होता कुंटणखाना; पोलिसांचा बनावट ग्राहक पाठवून छापा, ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त साईमत -नशिराबाद- प्रतिनिधी | नशिराबाद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सुनसगाव रस्त्यावरील एका शेतात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहात अटक केली असून दोन पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांना सुनसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतात कुंटणखाना चालवला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (२१ जुलै) दुपारी २.२० वाजेच्या सुमारास…