तोल गेला अन् जीव गेला! शेतातील विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू इंद्रापिंप्री गावावर शोककळा साईमत/अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील इंद्रापिंप्री येथे शेतात काम करत असताना विहिरीत पडून एका प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. बन्सीलाल भटा पाटील (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या अकाली निधनामुळे गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बन्सीलाल पाटील हे रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. यावेळी शेतातील विहिरीजवळ असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते विहिरीत कोसळले. ही बाब लक्षात येताच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. विहिरीत पडलेल्या पाटील यांना बाहेर काढण्यासाठी…
Author: Bharati Bharsake
ढोल-ताशे, फुगे आणि चॉकलेट; विद्यार्थ्यांच्या स्वागताने शाळा दुमदुमल्या साईमत/जळगाव/ प्रतिनिधी दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर अखेर सोमवारपासून (१५ जून) राज्यभर नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला उत्साहात प्रारंभ झाला. जळगाव जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लगबग, पालकांचा उत्साह आणि शिक्षकांचे स्वागतपर वातावरण पाहायला मिळाले. शाळांच्या घंटा पुन्हा एकदा खणखणल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक परिसर चैतन्यमय झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी विशेष तयारी केली होती. शाळांच्या प्रवेशद्वारांवर आकर्षक सडे-रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुगे, फुलांची सजावट, रंगीत कमानी आणि स्वागत फलकांनी शाळांचे परिसर सजविण्यात आले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात…
तीन दिवसानंतर रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन मागे शेतकरी कर्जमाफीच्या शासन निर्णयात (GR) सुधारणा करण्यासाठी पंढरपूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी थेट आंदोलनस्थळी धाव घेत रोहित पवार यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. या सकारात्मक मध्यस्थीनंतर २२ जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या निर्णायक बैठकीच्या अटीवर रोहित पवार यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. कर्जमाफीच्या जीआरमधील जाचक अटी बदलण्यासाठी रोहित पवार पंढरपुरात उपोषणाला बसले होते, ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. हा तिढा सोडवण्यासाठी…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मोहगावकर यांनी ‘मुख्य ज्युरी’ (Chief Jury) म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या जागतिक स्तरावरील कामगिरीमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तांत्रिक नियोजनात महत्त्वाची भूमिका या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा हाय-प्रोफाइल स्पर्धेत: गुणांकन प्रक्रिया अचूक ठेवणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, आंतरराष्ट्रीय परीक्षकांमध्ये समन्वय साधणे, आणि तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करणे, यांसारख्या अत्यंत जबाबदारीच्या आणि आव्हानात्मक गोष्टी मोहगावकर यांनी आपल्या कौशल्याने हाताळल्या. स्पर्धा कालावधीत त्यांनी केलेल्या…
विधान परिषदेच्या उमेदवारीवरून जिल्ह्यातील दोन मोठे नेते आमनेसामने साईमत -जळगाव- प्रतिनिधी |गाव विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. भाजपचे संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यात उमेदवारीवरून पडद्यामागे सुरू असलेली धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली आहे. दोघा बड्या नेत्यांनी एकमेकांवर जाहीरपणे पलटवार केल्याने जळगाव भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि नाराजी उघड झाली आहे. नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीने ठिणगी! जळगाव विधान परिषदेसाठी भाजपकडून अचानक नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या जागेसाठी अनेक वजनदार नेते शर्यतीत असताना अनपेक्षित नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. या निर्णयाबाबत पत्रकारांनी मंत्री…
मुंबई/जालना: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोरांविरोधात धडक मोहीम उघडणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे राज्यभरातून प्रचंड कौतुक होत आहे. मात्र, त्यांच्या या धडक कारवाया सुरू असतानाच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या बदलीची कुजबुज सुरू झाली आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी “सरकारने मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडूच नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशारा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे. तुकाराम मुंढेंचा धडाका; ‘मकोका’च्या इशाऱ्याने भेसळखोर गारद आपल्या कडक आणि पारदर्शक कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची शासकीय सेवेत आतापर्यंत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. नवीन विभागात…
मुंबई/अमरावती: राज्यभरात अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या ई-केवायसी (e-KYC) मोहिमेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून, एकट्या अमरावती जिल्ह्यातून तब्बल ३३ हजार ३०४ महिलांना कायमचे अपात्र ठरवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यात काही पुरुषांनीही महिलांच्या नावाने पैसे लाटल्याचे समोर आले असून, आता अशा बोगस लाभार्थ्यांकडून पैशांची वसुली केली जाणार आहे. या कारवाईमुळे राज्यभरातील अपात्र लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. अमरावतीत ३३ हजार महिला का झाल्या अपात्र? गेल्या ८-१० महिन्यांपासून प्रशासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी आणि ई-केवायसी मोहीम सुरू होती. या तपासणीत अपात्रतेची खालील प्रमुख कारणे…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जळगाव विमानतळावरून गेल्या एका वर्षात तब्बल १ लाख ४३ हजार ९९२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. वाढती प्रवासी संख्या आणि जळगावचे वाढते महत्त्व लक्षात घेता, विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५ कोटी रुपयांची विशेष योजना मंजूर करण्यात आली असून, यासाठीची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे साजऱ्या होत असलेल्या ‘प्रवासी सुविधा दिना’च्या पार्श्वभूमीवर विमानतळाचे संचालक हर्ष कुमार त्रिपाठी यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. एका वर्षात १.४३ लाख प्रवाशांची सफर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक…
होर्डिंगबाजीला फाटा देत जळगाव मनसेकडून ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण! जळगाव साईमत प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव मनसेच्या वतीने एक नवा आणि पर्यावरणपूरक आदर्श घालून देण्यात आला आहे. राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखाऊपणा किंवा अवाजवी खर्च न करता, शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये ५० बोगनवेलींच्या रोपांची लागवड करण्यात आली. ‘केवळ झाडे लावायची नाहीत, तर ती जगवायची’ हा राजसाहेबांचा विचार डोळ्यासमोर ठेवून या झाडांच्या संरक्षणाची आणि रोज पाणी घालण्याची संपूर्ण जबाबदारी मनसे सैनिकांनी अंगावर घेतली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवशी होर्डिंगबाजी किंवा फटाक्यांची आतिषबाजी न करता पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवण्याचे आदेश दिले होते. साहेबांच्या…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | ‘५४ अपक्ष आपलेच’ – गुलाबराव पाटील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की, ५४ अपक्ष नगरसेवक महायुतीसोबतच आहेत, ज्यामुळे विजय अधिक सोपा झाला आहे. त्यांनी आमदारांना निधी वाटपाचे अधिकार वापरून नगरसेवकांना निधी देण्याचे आवाहन केले आणि विजयी उमेदवाराने छोट्या नगरपरिषदांच्या विकासावर भर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘१००% मतदान आणि कडक शिस्त’ – गिरीश महाजन मंत्री गिरीश महाजन यांनी रोखठोक भूमिका घेत सर्व ५५० मतदारांना सकाळी १० च्या आधी शंभर टक्के मतदान करण्याचे आदेश दिले. मत बाद होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगतानाच, त्यांनी एक विशेष घोषणाही केली—ज्या नगरपरिषदेचे मतदान १० च्या आधी पूर्ण होईल,…