Author: Bharati Bharsake

 जळगाव पोलीस दलात प्रशासकीय फेरबदल; चाळीसगाव शहरासह विविध शाखांना नवे नेतृत्व साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी तसेच पोलीस प्रशासन अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलात काही महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार विविध पोलीस ठाणे व शाखांमधील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात येऊन नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांनी अधिकारांचा वापर करत १५ जून २०२६ रोजी झालेल्या जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, विविध विभागांतील समन्वय अधिक मजबूत करणे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे…

Read More

 जळगाव पोलिसांनी १२५ अट्टल आरोपींना घेतले ताब्यात साईमत/जळगाव/ प्रतिनिधी शहरात अलीकडील काळात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमिका घेत मोठी कारवाई केली. मंगळवारी (दि. १६) पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोंबिंग ऑपरेशनमध्ये अवघ्या तीन तासांत १२५ अट्टल आणि सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. या धडक मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रभावी वचक निर्माण करणे या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली होती. पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेदरम्यान शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी पोलिसांची…

Read More

नहाटा चौफुलीवर रचला सापळा; लाचेचे ५ हजार रुपये थेट ‘PhonePe’ वरून ट्रान्सफर! साईमत -जळगाव- प्रतिनिधी | सावकारी व्यवसायाचा परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यासह दोन खाजगी प्रमाणित लेखापरीक्षकांना (ऑडिटर) जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे भुसावळ आणि जळगाव जिल्हा सहकार वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. १५ जून रोजी भुसावळ येथील नहाटा चौफुली परिसरात हा यशस्वी सापळा रचण्यात आला. ​याप्रकरणी सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड, खाजगी ऑडिटर सुरेश जनार्दन विपुते (वय ६२) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०) यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक…

Read More

टायर फुटल्याने दुर्घटना; गुजरातहून हैदराबादला चालला होता रिफाइंड तेलाचा ट्रक साईमत -जळगाव- प्रतिनिधी |नागपूर महामार्गावर आज एक अत्यंत थरारक आणि भीषण दुर्घटना घडली. गुजरात येथून रिफाइंड तेल आणि ऑइल पावडर घेऊन हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. ट्रकचा टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. ​काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! ​हा ट्रक महामार्गावरून वेगात जात असताना अचानक मोठा आवाज होऊन ट्रकचा टायर फुटला. त्यानंतर काही क्षणांतच ट्रकमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि…

Read More

​’डायल ११२’ आणि ‘१०९८’चे धडे; सोयगाव पोलिसांकडून चिमुरड्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जिल्हाभरात शाळांचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. नवीन वर्ग, नवीन पुस्तके आणि नव्या मित्रांच्या कुतूहलाने चिमुरड्यांची पावले शाळेकडे पडत असतानाच, सोयगाव तालुक्यातील शाळांच्या आवारात आज एक अत्यंत भावनिक आणि आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. एरवी खाकी वर्दीला पाहून दुरूनच पळ काढणारी लहान मुले आज त्याच खाकी वर्दीतील पोलिसांशी हसत-खेळत गप्पा मारताना दिसत होती. निमित्त होते, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेल्या ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ या अभिनव उपक्रमाचे! ​सलोखा आणि संवादाचा ‘शाळा प्रवेशोत्सव- २६’ ​पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात…

Read More

दुष्काळाच्या छायेत शेतकरी कोलमडला, अडावद येथे टोकाचे पाऊल कुटुंबावर दुःखाचा डोंगर साईमत/अडावद (ता. चोपडा)/ प्रतिनिधी : यंदाच्या खरीप हंगामातील अनिश्चित पावसामुळे आणि वाढत्या आर्थिक ताणतणावामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा गंभीर संकट ओढवल्याचे हृदयद्रावक चित्र अडावद येथे समोर आले आहे. वरचा माळी वाडा परिसरातील अल्पभूधारक शेतकरी गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) यांनी आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गोविंदा गंभीर हे पाच एकर कोरडवाहू शेतीवर आपला उदरनिर्वाह करत होते. मागील वर्षी मका पिकातून अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. त्या तोट्याची भरपाई यावर्षीच्या हंगामातून होईल,…

Read More

१९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष पेन्शन व पी.एफ. कार्यशाळा; समस्यांचे थेट निराकरण होणार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, १९ जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. या कार्यशाळेत महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१, मुंबई येथील चार अधिकारी उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी समजून घेणार आहेत. पेन्शन, पी.एफ., तसेच इतर संबंधित सेवा व प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन करून जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना…

Read More

कारवरील नियंत्रण सुटले आणि अनर्थ घडला कारची दुचाकी व पादचाऱ्यांना धडक सावद्यात भीषण अपघातात एकाचा मृत्यू साईमत/सावदा/ प्रतिनिधी : सावदा शहरात सोनाली कोल्ड्रिग्ज परिसरात रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी सुमारे ५ वाजता घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. भरधाव वेगात आलेल्या कारने आधी दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचाऱ्यांना चिरडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव (ता. रावेर) येथील सरफराज समशेर तडवी हा हुंडाई आय-२० (क्र. एमएच ०१ एआर २७०६) कारने वाघोदा बु.कडून सावद्याच्या दिशेने अतिवेगाने व निष्काळजीपणे येत होता. सावदा–वाघोदा मार्गावर त्याने विनानंबर स्प्लेंडर…

Read More

मॉर्निंग वॉकदरम्यान ७५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास दुचाकीवरील चोरटे भुसावळ दिशेने पसार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी शहरातील आयोध्या नगर परिसरात रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ७५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोध्या नगरातील रहिवासी मंगला शांताराम चौधरी (वय ७५) या रविवारी सकाळी साधारण ६ वाजता नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या आयोध्या किराणा समोरील गल्लीतून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले. दुचाकी चालवत असलेल्या तरुणाने “तृप्ती कॉर्नर कुठे आहे?” अशी…

Read More

दामिनी पथकाकडून विद्यार्थिनींना दिले सुरक्षिततेचे धडे साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ‘विद्यार्थी सुरक्षा उपक्रम’ अंतर्गत भुसावळ शहरात दामिनी पथकाने सोमवारी शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विशेष गस्त मोहीम राबवून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर भर दिला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दामिनी पथकाने शहरातील विविध शाळा–महाविद्यालये, मुख्य बसस्थानक आणि रिक्षा थांबे परिसरात अचानक भेटी देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. या कारवाईमुळे परिसरात टवाळखोर आणि रोडरोमिओंमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी केवळ…

Read More