साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अखंड भारत संकल्प दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रारंभी सर्वत्र भारत मातेचे पूजन करण्यात आले. प्रताप विद्या मंदिरात डॉ. शैलेंद्र महाले, पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. प्रा. मोहनी उपासनी, महिला मंडळ विद्यालयात प्रा. साक्षी गुजराथी यांनी तर बालमोहन विद्यालयात माजी सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विवेकानंद विद्यालयातही अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुका संयोजक प्रशांत सोनवणे, गौरव सोनार, विजय दिक्षीत, श्री.वाघ आदी उपस्थित होते. यांनी घेतले परिश्रम यशस्वीतेसाठी शहर मंत्री हर्षल पाटील, हरीष बारी, जयेश गुजर,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चोपडा : प्रतिनिधी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या आदेशाने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगबाबत जनजागृती करणे सुरु आहे. त्यामध्ये तालुक्यातील किशोर सैंदाणे, प्रमोद पाटील, कमलेश बडगुजर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत स्वातंत्र्यदिनी विविध ठिकाणी जनजागृती केली. प्रत्येक गावात जावून ग्रामसभा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, विषयावर परीक्षा घेऊन त्यांनी जिल्ह्यातील तसेच संपूर्ण तालुक्यात क्षयरोग आजारावर जनजागृती करणार आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त वडगाव बु. आणि सुटकार येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत, ध्वजारोहणाप्रसंगी राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांकडून क्षयरोग आजाराबाबत व त्याकरीता मिळणाऱ्या मोफत औषधी याविषयी सखोल माहिती देत मार्गदर्शन केले. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सकारात्मक कामातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संदर्भातला लोकांचा विश्वास वाढेल, अशा प्रकारचे काम पोलीस प्रशासनाकडून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य लोकप्रतिनिधी म्हणून आपण द्यायला तयार आहोत. तसेच शहराच्या सुरक्षितेसाठी पोलिसांची कार्यक्षमता वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी केले. पोलीस कवायत मैदान परिसरातील आणि आ.मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून नूतनीकरण केलेल्या पोलीस आराम कक्षाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, भाजपाचे…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील धनगर समाजाच्यावतीने राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपस्थित बांधवांनी राष्ट्रमाता अहिल्याबार्इंनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला. तसेच ‘येळकोट येळकोट… जय मल्हार…’ अशा घोषणा देऊन त्यांना अभिवादन केले. त्याच दिवशी अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील होते. सभेला सचिव प्रदीप सोनवणे, सहसचिव सुनील नेमाडे, कडबा पाटील, आकाश नेमाडे, राजेंद्र सावळे, गजानन बोरसे, रुपेश बोराडे विजय सूर्यवंशी, सुखदेव पाटील, मानकर अण्णा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत सचिवांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून दाखविले. ते सर्वांनी मंजूर केले. त्यानंतर २०२२-२०२३ चा जमा खर्च वाचून दाखविला. तसेच…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावरला येथील देवश्री माध्यमिक विद्यालयात मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे संचालक डॉ. पन्नालाल बोहरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल बोहरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बोहरा, प्रमोद पाटील, युवराज जाधव, अन्ना पाटील, ग्रा.पं.सदस्य गणेश पाटील, नाना पाटील, मुख्याध्यापक आर.एस.उगले आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात तनिषा सपकाळ, दिशा जाधव, महेश कोळी, पवन इंगळे यांनी भाषणे तर रेणुका पाटील, कोमल इंगळे, प्रणाली सपकाळ, श्रुतीका तायडे, नेहा सुरळकर यांनी स्वागत व देशभक्तीपर गीते सादर केले. शुभम वाघ आणि चेतन बोदडे यांनी रॅप साँग सादर केले. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. उगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात वृक्षवल्ली फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी भेट दिली जाते. या महिला ग्रुपने मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथील विनायक दादा यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयासाठी पंखा भेट देण्यात आला. तसेच शाळेत ध्वजारोहण होऊन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी अपेक्षा पवार यांच्या देशभक्ती गीताला पोलीस पाटील कविता पाटील यांनी ५०० रुपयाचे बक्षीस दिले. याप्रसंगी वृक्षवल्ली ग्रुपच्या अध्यक्षा नीलिमा सोनकुसरे, उपाध्यक्ष योगिता पांडे (गायिका/सचिव), अपेक्षा पवार, दिशा संदानशिव, स्वाती बोरसे, सुनिता वानखेडे, अनिता जाधव, मोहिनी सोनार, मुख्याध्यापक पवार, श्री.पाटील, श्री.पांडे, श्री.चव्हाण, श्री.धनगर, राजू आबा, किशोर आबा, सरपंच…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनामुळे एका चालत्या-बोलत्या विद्यापीठास मुकलो असल्याचा सूर जनमाणसातून निघत आहे. त्यामुळे हरी नरके यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, अशी प्रार्थना करून अमळनेरमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि माळी समाजाच्यावतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, माळी समाजाचे युवक कार्यकर्ते धीरज चव्हाण यांनी नरके यांच्या स्मृतींना उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले. यावेळी माळी समाजाचे सचिव गणेश महाजन, कैलास महाजन, पुरुषोत्तम महाजन, परिश्रम मतिमंद मुलांच्या शाळेचे चेअरमन योगेश महाजन, प्रा.महेंद्र महाजन, युवक कार्यकर्ते धिरज चव्हाण…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचालित कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या समारोपनिमित्त भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी दिनकर सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, पर्यवेक्षक एस.पी.निकम आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन करण्याचे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या रॅलीला दिनकर सोनवणे यांनी झेंडा दाखविला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहरातील श्री सरस्वती प्रसारक मंडळ संचलित पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात खोट्या ठरावांसह दाखल्यांद्वारे दोन शिक्षण सेवकांची बेकायदा भरती करून शासनाची तब्बल १७ लाख २ हजार ६३० रूपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तक्रार अर्जावरून संस्थाध्यक्षा, प्राचार्य, दोन शिक्षण सेवकांसह सहा जणांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित पी. के.कोटेचा महिला महाविद्यालयात महेश चौधरी व रुकसाना बी.ताज्जुमल यांना २०१४ ते २०१७ या काळात संस्थेत शिक्षण सेवक म्हणून कागदोपत्री रूजू करून घेण्यात आले. तसेच त्याबाबत खोटा ठराव व खोटे दाखले तयार करण्यात आले. याबाबत…
साईमत, सावदा, ता. रावेर : वार्ताहर आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करून फरार झालेला संशयित आरोपी तथा शाळा समितीचा चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. दुसरीकडे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनाही तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. सविस्तर असे की, सावदा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचा शाळेच्या चेअरमननेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शालेय समितीचे चेअरमन अक्रम खान अमानुल्ला खान या प्रमुख संशयितासह मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांच्या विरोधात ७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे सर्व जण पोलिसांच्या हातावर…