ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे

0
4

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक खरे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप हे खोटे, बनावट व हास्यास्पद बिनबुडाचे असल्याचे सरपंच अक्षय जैस्वाल यांनी दिलेल्या निवेेदनात म्हटले आहे. लोहारा ग्रा.पं.त दीपक खरे हे १५ फेबु्रवारी २०२१ पासून ग्रा.पं. सदस्य पदावर कार्यरत आहे. पदावर कार्यरत झाल्यापासून ते आजपर्यंत ग्रा.पं.च्या मासिक सभेत ग्रा.पं.ने विकास कामावर व कर्मचाऱ्यांच्या पगारावर आक्षेप घेत खर्च नामंजूर करण्याबाबत लेखी पत्र देऊन ग्रा.पं.च्या प्रोसिडिंग बुकात नोंद घेण्याबाबत सुचविल्याने त्यांनी खर्च हा नाकारला आहे, तशी लोहारा ग्रा.पं.च्या प्रोसिडिंग बुकात लेखी नोंद घेतली आहे.

पाचोरा तालुक्यातील लोहारा ग्रा.पं.चे सदस्य दीपक खरे हे गावाचा विकास किंवा वार्ड क्र.४ मधील विकास कामाचा आव व पुळका आणून लोहारावासियांची दिशाभूल करीत आहे. १५ फेब्रुवारी २०२१ पासून ग्रामपंचायतीने वस्तीमध्ये विकास कामे व्हावीत, यासाठी १५ वा वित्त, ग्रामनिधी, रोजगार हमी योजना यामधून कामे मंजूर करून अंदाजपत्रक व निविदा मंजूर केल्या आहेत. त्यात मागासवर्गीय वस्तीत असलेल्या अंगणवाडी दुरुस्ती काम सुरु आहेत. मागासवर्गीय वस्तीत १५ वा वित्त आयोग अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, मागासवर्गीय वस्तीत १५ व्या वित्त आयोग अंतर्गत काँक्रीट गटार बांधणे, मागासवर्गीय त्यांच्या मागणीनुसार सुशोभित गेट बनविणे सुरू आहे, वस्तीतील मुले व इतर मुले यांना स्वतंत्र इमारत नसल्याने इमारत मंजूर केली आहे. ही सर्व कामे किंवा गावातील इतर बांधकामे गावाला मार्च २०२३ पासून तीव्र पाणीटंचाई असल्याने कामे बंद आहेत. त्यामुळे पाण्याअभावी कामे सुरू करता आली नाही. लोहारा भागात अद्यपाही अति अल्प पाऊस झाल्याने आजही शासनाच्या टँकरद्वारे गावाला पाणी पुरविले जात आहे. परंतु पाणी उपलब्ध झाल्यावर गावातील प्रलंबित व प्रस्तावित केलेली संपूर्ण कामे सुरू होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्यासाठी हा आकाड-तांडव त्यांच्याकडून सुरू आहे.

श्रेय मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न

लोहारा ग्रामपंचायतीला त्यांनी केलेल्या आरोपानुसार कामेच करायची नसती तर कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता किंवा टेंडर केले नसते. ग्रामपंचायत सदस्य दीपक खरे यांना या सर्व कामांबाबत माहिती आहे. परंतु, ही कामे माझ्यामुळे होणार आहे आणि त्या कामांचे श्रेय मिळावे, यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करीत आहे. ग्रामपंचायतीने मागील दोन वर्षात गाव हिताचेच कामे केली आहे. यापुढेही करतच राहू, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here