साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अखंड भारत संकल्प दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रारंभी सर्वत्र भारत मातेचे पूजन करण्यात आले.
प्रताप विद्या मंदिरात डॉ. शैलेंद्र महाले, पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. प्रा. मोहनी उपासनी, महिला मंडळ विद्यालयात प्रा. साक्षी गुजराथी यांनी तर बालमोहन विद्यालयात माजी सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विवेकानंद विद्यालयातही अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुका संयोजक प्रशांत सोनवणे, गौरव सोनार, विजय दिक्षीत, श्री.वाघ आदी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी शहर मंत्री हर्षल पाटील, हरीष बारी, जयेश गुजर, पार्थ पाटील, मुकेश बडगुजर, गौरव सोनवणे, सागर न्हावी, परेश गुजर, सुमित पाटील, नमन पाटील, भाग्यश्री खैरनार, नेहा पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.