सावरला येथील देवश्री माध्यमिक विद्यालयात ध्वजारोहण

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सावरला येथील देवश्री माध्यमिक विद्यालयात मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी संस्थेचे संचालक डॉ. पन्नालाल बोहरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अनिल बोहरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बोहरा, प्रमोद पाटील, युवराज जाधव, अन्ना पाटील, ग्रा.पं.सदस्य गणेश पाटील, नाना पाटील, मुख्याध्यापक आर.एस.उगले आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात तनिषा सपकाळ, दिशा जाधव, महेश कोळी, पवन इंगळे यांनी भाषणे तर रेणुका पाटील, कोमल इंगळे, प्रणाली सपकाळ, श्रुतीका तायडे, नेहा सुरळकर यांनी स्वागत व देशभक्तीपर गीते सादर केले. शुभम वाघ आणि चेतन बोदडे यांनी रॅप साँग सादर केले. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. उगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यशस्वीतेसाठी उपशिक्षक विवेक भोंगे, संतोष भगत, राजू बाविस्कर, अण्णा जाधव, महेश राणे, आशिष पाटील, राजू पाटील यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन विवेक भोंगे तर आभार संतोष भगत यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here