अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेची वार्षिक सभा उत्साहात

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील धनगर समाजाच्यावतीने राष्ट्रमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपस्थित बांधवांनी राष्ट्रमाता अहिल्याबार्इंनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला. तसेच ‘येळकोट येळकोट… जय मल्हार…’ अशा घोषणा देऊन त्यांना अभिवादन केले. त्याच दिवशी अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डी.डी.पाटील होते. सभेला सचिव प्रदीप सोनवणे, सहसचिव सुनील नेमाडे, कडबा पाटील, आकाश नेमाडे, राजेंद्र सावळे, गजानन बोरसे, रुपेश बोराडे विजय सूर्यवंशी, सुखदेव पाटील, मानकर अण्णा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सभेत सचिवांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून दाखविले. ते सर्वांनी मंजूर केले. त्यानंतर २०२२-२०२३ चा जमा खर्च वाचून दाखविला. तसेच अहवाल वाचन केले. ते बहुमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचा २०२३ ते २४ अंदाजपत्रकही सर्वांनी मंजूर केले. लवकरच संस्थेच्या नावाने बँकेत खाते खोलणे आवश्‍यक असल्याचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी सांगितले. त्यावर सर्वांनी होकार दिला. आपण स्वतः थोडाफार निधी जमा करून इतर समाज बांधवाकडून निधी जमा करण्याचे मान्य केले. त्यानंतर सभेचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here