Author: Sharad Bhalerao

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री येथे बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दोन जणांना ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण नंदलाल जैस्वाल (मध्य प्रदेश) आणि राधेशाम शरद जाखेटे (रा. वडगाव बु., ता. चोपडा, ह.मु.फॉरेस्ट कॉलनी, जळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुणांनी बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वेगवेगळ्या दुकानांवर जाऊन त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यात भाजीपाला विक्रेते विजय प्रकार बडगुजर (वय ४३, रा. पिंप्री, ता. धरणगाव)…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करावी, असे पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. त्यावरुन पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव शहर पो.स्टे. हद्दीतील टाकळी प्र.चा., ओझर, पातोंडा शेतशिवारातील अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार होत असलेल्या ५ ठिकाणी धाड टाकली. त्यात १ लाख ३८ हजार ४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यात अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी ५ ठिकाणी धाड टाकली. त्यात गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याच्या साहित्यासह मोटार सायकल, मोबाईल असा १ लाख ३८ हजार ४० रुपयाचा…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहुरपेठ परिसरातील नवकार बंगला येथे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, देवळातील मूर्त्या असा ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील पहूर येथे नवकार बंगला येथील रहिवासी दिनेश अनिल जैन (वय ३५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते १७ ऑगस्ट सकाळी ९ वाजता दरम्यान त्यांचे घर बंद होते. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच देवळातील मूर्त्या असा…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला फोनवरून एकाकडून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, उषाबाई सुभाष चव्हाण (वय ४०) या महिला जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून बोदवड येथील इरफान सैय्यद याने शनिवारी, १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी महिलेच्या फोनवरून कॉल करून शिवीगाळ करत ‘माझ्याविरोधात पोलिसात तक्रार दिली तर तुझ्या परिवाराला जीवंत सोडणार नाही’, अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी भामरे गावातील मामाच्या घरून निघून चाळीसगावकडे येत असतांना ओझर गावाजवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या एसटीने दिलेल्या धडकेत पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी बसचालकाविरुध्द उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. सविस्तर असे की, भामरे येथून मामाच्या घरून मोटर सायकलवरून पुन्हा चाळीसगाव येथे येत असतांना चेतन कांताराम पाटील (वय २५) याला चाळीसगाव शहरालगतच्या ओझर गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ चाळीसगावकडून येणाऱ्या नाशिक-पाचोरा बसने (क्रमांक एमएच-०६, एस- ८८९८) समोरून डावीबाजूने धडक दिली. त्यात चेतन पाटील हा बसच्या उजव्या चाकाजवळ अडकला जाऊन बसमध्ये फरफटत गेला. यावेळी त्याच्या पाठीमागून चालत असलेले…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नारायणवाडीतील रहिवासी सागर बबनराव नागणे यांच्याबद्दल चाळीसगावमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. पंचायत समितीत शहीद जवानांच्या नावे असलेल्या कोनशिलात चक्क जिवंत शेतकऱ्याचा शहीद जवान म्हणून उल्लेख केला आहे. या कोनशिलाचे १५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले. शहीद जवानांसाठी बनविण्यात आलेल्या कोनशिलात आपले नाव पाहून सागर नागणे यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंचायत समितीच्या प्रशासनाला जाब विचारल्यावर त्यांनी या प्रकरणात कुठलीही माहिती न देता या कोनशिलावरून शेतकऱ्याचे नाव हटविले आहे. गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर संपर्क होऊ शकला नाही. यासंदर्भात कार्यालयातील शिपायाने ते ग्रामीण भागात गेले असल्याचे सांगितले.…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ चोपडा आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रभक्तीपर समूह गीत गायनाच्या स्पर्धेचे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजन केले होते. स्पर्धेत जवळपास २० संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेला भारतमातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे उप मुख्याधिकारी निलेश ठाकूर, रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटिया, मानद सचिव अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख पंकज पाटील, सहप्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे व स्पर्धा परीक्षक शिवरंजनी संगीत विद्यालयाचे मनोज चित्रकथी, विजय पालिवाल, प्रीती गुजराथी आदी उपस्थित होते. स्पर्धेत प्रताप विद्या मंदिराने दोन गटात प्रथम आणि एका गटात कनिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्री अर्थात १४ ऑगस्ट रोजी ७६ मशाली प्रज्ज्वलित करून रॅली काढली. त्यातून एकता आणि अखंडतेचा संदेश दिला. यावेळी’भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्‌‍‍’ आदी घोषणा देत मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या नेतृत्वात हातात तिरंगा व प्रज्ज्वलित मशाली घेऊन मंगळग्रह मंदिरापासून रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि व्हॉईस ऑफ इंडियाचे पदाधिकारी, सदस्यही सहभागी झाले होते. बोरी नदीपुलावरून रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक पोहोचली. तेथे सेवेकरी गणेश सपकाळे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई चौकात सेनादलातील निवृत्त जवान राजेंद्र यादव यांनी हुतात्मा स्मारकास,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहराच्या सुरक्षितेसाठी दीड कोटी रुपये किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्पासाठी शासनस्तरावर पाठपुरवठा करुन लवकरच चाळीसगाव शहरात आधुनिक प्रणालीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच ग्रामीण भागातील गावासाठी १५० सीसीटीव्ही कॅमेरे देणार असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार होते. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या ” एक कॅमेरा पोलिसांसाठी ” या संकल्पनेतून तसेच चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील सितामाई नगर, वीर सावरकरनगरमधील रहिवाशांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे कॉलनी परिसरात लावून कॉलनी परिसर…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या प्रांगणात ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या कल्पनेतून आर्मी स्कूलचा ‘बेस्ट लिटर’ मयूर हटकर या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण, गीते तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर अभिनय सादर केला. त्यांना ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका प्राजक्ता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आर्मी स्कूलच्या कलाशिक्षिका पी.सी.पाटील यांनी आपले वडील आणि जागतिक दर्जाचे चित्रकार स्व. सी.एन.पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. ते दरवर्षी असे कार्यक्रम स्वखर्चाने घेत असतात. यावेळी दैनिक ‘साईमत’ वृत्तपत्राच्या “न्यूज फ्रेम”…

Read More