गावठी दारु तयार करणाऱ्यांवर पोलिसांची धाड

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करावी, असे पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांना आदेशित केले होते. त्यावरुन पथकातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चाळीसगाव शहर पो.स्टे. हद्दीतील टाकळी प्र.चा., ओझर, पातोंडा शेतशिवारातील अवैध गावठी हातभट्टीची दारु तयार होत असलेल्या ५ ठिकाणी धाड टाकली. त्यात १ लाख ३८ हजार ४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यात अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी ५ ठिकाणी धाड टाकली. त्यात गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याच्या साहित्यासह मोटार सायकल, मोबाईल असा १ लाख ३८ हजार ४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कच्चे रसायन आणि साहित्य जागीच नष्ट केले. याप्रकरणी संतोष छगन दळवी, प्रकाश पांडु गायकवाड, जयवंताबाई जयराम सोनवणे (तिघे, रा.टाकळी प्र.चा., ता.चाळीसगाव), जंगलसिंग रामसिंग गायकवाड, रमेश नाईक (दोघे, रा.ओझर, ता.चाळीसगाव) यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स.पो.नि. सागर ढिकले, विशाल टकले, पो.उप.नि. सुहास आव्हाड, पो.हे.कॉ. अजय मालचे, पंकज पाटील, पो.ना. किशोर पाटील, राकेश पाटील, भूषण पाटील, पो.शि. चतेरसिंग महेर, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर गिते, राकेश महाजन, समाधान पाटील, सुनील निकम, ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, आशुतोष सोनवणे, दिलीप राक्षे, रवींद्र बच्छे, सुनील पाटील यांनी कारवाई केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here