आर्मी स्कूलला विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या प्रांगणात ७६ वा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य पी.एम.कोळी यांच्या कल्पनेतून आर्मी स्कूलचा ‘बेस्ट लिटर’ मयूर हटकर या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण, गीते तसेच ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर अभिनय सादर केला. त्यांना ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका प्राजक्ता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आर्मी स्कूलच्या कलाशिक्षिका पी.सी.पाटील यांनी आपले वडील आणि जागतिक दर्जाचे चित्रकार स्व. सी.एन.पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस वितरण सोहळ्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. ते दरवर्षी असे कार्यक्रम स्वखर्चाने घेत असतात. यावेळी दैनिक ‘साईमत’ वृत्तपत्राच्या “न्यूज फ्रेम” चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.एम.कोळी होते.

यावेळी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील, हवालदार धनराज पाटील, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.वाय.देवरे, बी.एड. कॉलेजचे प्राचार्य प्रा.पी.पी.चौधरी, आय.टी.आय.चे प्राचार्य के.बी.बाविस्कर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.शुभांगी चव्हाण, कृषी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.संदीप पाटील, क्रीडा शिक्षक व्ही. जी. बोरसे बोरसे, दै.’साईमत’चे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील, शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद पाटील, सदस्य व्ही. डी. पाटील, संजय पाटील, सर्व युनिटचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन शरद पाटील तर संजय पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here