बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लांबविला

0
26

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पहुरपेठ परिसरातील नवकार बंगला येथे बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, देवळातील मूर्त्या असा ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील पहूर येथे नवकार बंगला येथील रहिवासी दिनेश अनिल जैन (वय ३५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते १७ ऑगस्ट सकाळी ९ वाजता दरम्यान त्यांचे घर बंद होते. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच देवळातील मूर्त्या असा ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरमालक दिनेश जैन यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here