Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्‌स, एस.एम.ए सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव येथे स्टाफ अकॅडमीतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त ‘नवीन शैक्षणिक धोरण’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर होते. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. अशोक पितांबर खैरनार होते. डॉ. खैरनार यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण विषयाचे फायदे त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. याप्रसंगी संपदा पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त सदिच्छा भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. व्याख्यानासाठी उपप्राचार्य डॉ.अजय काटे, उपप्राचार्य धनंजय वसईकर, उपप्राचार्य डॉ.कला खापर्डे यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक वृंद उपस्थित होते.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपप्राचार्य वासाईकर यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील समिती सदस्य प्रा. किशोर पाटील, प्रा. पंकज नन्नवरे, प्रा.एम.ओ.अहिरे, डॉ. ए.ए.वनीकर, डॉ. दिपाली बंसवाल, प्रमोद पवार तसेच हेमंत गायकवाड, संजय जाधव विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील आदर्शनगर हिरापूर रोड दि कॅप्टन अकॅडमी संचलित ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिनी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अभ्यासपूर्वक अध्यापन केले. आठवीत शिकणारा प्रणव चव्हाण हा शाळेच्या मुख्याध्यापकांच्या भूमिकेत तर मयूर शिंगटे हा प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेत होता. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांनी चित्रकला स्पर्धा आयोजन केले होते. स्पर्धा परीक्षेचा निकाल मिसबा मुराद पटेल हिने जाहीर केला. विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांचे पुष्पगुछ देऊन विद्यार्थ्यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी चालविलेल्या शाळेचे कौतुक मुख्याध्यापिका सुनिता देवरे यांनी केले. संध्या फासे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शालिनी बोरसे, उज्ज्वला सूर्यवंशी, राजश्री…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयातील बालगोपाळांनी गोविंदा आला रे…म्हणत दहीहंडी फोडत गुरुवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा साजरा केला. यावेळी तीन थर लावून उंचावर बांधलेली दहीहंडी फोडल्याने गोविंदांनी एकच जल्लोष केला. बालवयापासूनच मुलांना भारतीय सण – उत्सवांची परंपरा माहित व्हावी. आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा. यासाठी बालकमंदिर, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी करुन घेण्यात आले. काही मुले गोविंदा तर काही श्रीकृष्णाच्या आणि मुली गोपिका, राधेची वेषभूषा करुन आले होते. वेगवेगळ्या गाण्यांवर थिरकत, अंगावर पावसाचे थेंब झेलत त्यांनी जन्माष्टमीच्या पर्वणीत आनंद लुटला. यावेळी मुख्याध्यापिका मंजूषा नानकर यांनी जन्माष्टमीची माहिती तर शिक्षक जिजाबराव वाघ उत्सवाची परंपरा सांगितली. यांनी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाच्या अंतर्गत गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका आणि तुळजाई बहुउद्देशीय संस्था मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवस पथनाट्य व जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. मेहरुणमधील तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचेे संस्थापक-अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांच्यामार्फत मेहरूण परिसरातील श्रीराम विद्यालय, या.दे.पाटील, विद्यालय येथे कलावंत शैलेश दुबे, नेहा पवार, बुद्धभूषण मोरे, निलेश लोहार, लखन तिवारी, करण मानकर यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यात त्यांनी जागतिक शुध्द हवा दिवसावर ही माहिती कलेतून हसत खेळत दिली. उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध हवेचे महत्व सांगण्यात आले. दैनंदिन वापरात कशाप्रकारे हवेचे प्रदूषण आटोक्यात आणता येईल, याबद्दल पथनाट्याद्वारे माहिती देण्यात…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचलित प्रगती बालवाडी प्राथमिक व माध्यमिक शाळेत गुरुवारी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दोरी बांधून त्याला पताका, फुगे व फुलांची माळ, लावण्यात आली. मध्यभागी दहीहंडी सजवून लावण्यात आली. मुख्याध्यापिका ज्योती कुलकर्णी, संगीता गोहील, मनीषा पाटील यांच्या हस्ते दहीहंडीची पूजा करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात बाल गोपालांनी दहीहंडी फोडली. टाळ्या वाजवून व नाचत नाचत चिमुकल्यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी गोपाळकाल्याचा प्रसाद सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावरला येथील देवश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापक आर. एस. उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ शिक्षक विवेक घोंगे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌‍‍ यांच्याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानिमित्त विद्यार्थ्यांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनी शाळेत शिकविण्याचा अनुभव घेऊन ज्ञानार्जन केले. तसेच एक दिवस शाळेचे प्रशासन सांभाळले. त्यात योगिता इंगळे, रेणुका पाटील, तनिषा सपकाळ, नेहा सुरळकर, श्रुतिका तायडे, वैभव कोळी, सुमित पाटील, पवन इंगळे, परमेश्वर कोळी, महेश कोळी, विश्वजित सुरवाडे, कृष्णा जाधव यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी उपशिक्षक संतोष भगत, आशिष पाटील, राजू बावस्कर, अजय जाधव, महेश राणे, पुंडलिक पाटील…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या सत्कारासह कवी संमेलन रंगले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी तथा लेखक प्रा. वा. ना. आंधळे होते. ज्ञानदानाचे महान कार्य करणाऱ्या प्रा. प्रकाश महाजन, प्रा. वा. ना. आंधळे, प्रा. विजेंद्र पाटील, भास्करराव चव्हाण, विजय लुल्हे, गोविंद पाटील, अरूण वांद्रे यांचा मंडळातर्फे संस्थापक-अध्यक्ष गोविंद देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणातून डॉ. राधाकृष्णन्‌‍‍ यांच्याबद्दल माहिती विषद केली. कविसंमेलनात सादर केलेल्या कवितांना उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. कविसंमेलनात प्रा. वा. ना. आंधळे, प्रा. विजय लुल्हे, अरूण वांद्रे, किशोर गायकवाड, संतोष साळवे, पानाचंद चौधरी, निवृत्ती कोळी, श्रीमती मंदाकिनी…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा परिसरातील गणपती नगरामधील महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा नुकतीच उत्साहात पार पडली. त्यानंतर सायंकाळी ६ ते १० वाजेदरम्यान, महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. पिंप्राळा ते सावखेडा रस्त्यावरील गणपती नगरात सायंकाळी महादेव पिंड, गणपती, नंदी व कासवाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सकाळापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत पूजा विधी व यज्ञ करण्यात आला. त्यानंतर आ.राजुमामा भोळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे व आकाश पारधे यांनी जलाभिषेक करून उपस्थित भाविकांना रूद्राक्ष वाटप केले. यावेळी मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होती. यशस्वीतेसाठी भैय्या पाटील, कुणाल राजपूत,…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चांदसर येथील हायस्कूलचे उपशिक्षक प्रकाशचंद्र साळुंखे यांची कन्या तथा चोपडा तालुक्यातील वर्डी येथील स्व.व्यंकटराव त्र्यंबकराव पाटील गुरुजी यांची नात कार्तिकी साळुंखे हिची राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य विक्रीकर निरीक्षकपदी (एसटीआय) नुकतीच निवड झाली आहे. जळगाव येथील एसएसबीटी कॉलेजमधून बी. ई. झालेली कार्तिकी यापूर्वी तिची २०१८ साली सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी एसआयडीपदी निवड झाली होती. राज्य विक्रीकर निरीक्षकपदी नुकतीच जळगाव येथे रुजू झालेली कार्तिकी साळुंखे ही अजुनही मोठं स्वप्न पाहत राज्य सेवेची तयारी करत आहे. कार्तिकीला आई, वडील, भाऊ, मामा यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल तिचे गावासह सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More