चाळीसगाव महाविद्यालयात स्टाफ अकॅडमीतर्फे व्याख्यान

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्‌स, एस.एम.ए सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज चाळीसगाव येथे स्टाफ अकॅडमीतर्फे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त ‘नवीन शैक्षणिक धोरण’ विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर होते. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती दिली. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. अशोक पितांबर खैरनार होते.

डॉ. खैरनार यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण विषयाचे फायदे त्यांनी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. याप्रसंगी संपदा पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त सदिच्छा भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. व्याख्यानासाठी उपप्राचार्य डॉ.अजय काटे, उपप्राचार्य धनंजय वसईकर, उपप्राचार्य डॉ.कला खापर्डे यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.सुनिता कावळे, सूत्रसंचालन प्रा. दीपक पाटील तर आभार प्रा.अच्युत चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here