राष्ट्रीय शुध्द हवा दिनानिमित्त मनपातर्फे पथनाट्यातून जनजागृती

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाच्या अंतर्गत गुरुवारी, ७ सप्टेंबर रोजी जळगाव शहर महानगरपालिका आणि तुळजाई बहुउद्देशीय संस्था मेहरूण यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय शुद्ध हवा दिवस पथनाट्य व जनजागृतीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
मेहरुणमधील तुळजाई बहुउद्देशीय संस्थेचेे संस्थापक-अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांच्यामार्फत मेहरूण परिसरातील श्रीराम विद्यालय, या.दे.पाटील, विद्यालय येथे कलावंत शैलेश दुबे, नेहा पवार, बुद्धभूषण मोरे, निलेश लोहार, लखन तिवारी, करण मानकर यांनी पथनाट्य सादर केले. पथनाट्यात त्यांनी जागतिक शुध्द हवा दिवसावर ही माहिती कलेतून हसत खेळत दिली.

उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शुद्ध हवेचे महत्व सांगण्यात आले. दैनंदिन वापरात कशाप्रकारे हवेचे प्रदूषण आटोक्यात आणता येईल, याबद्दल पथनाट्याद्वारे माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मनपाचे अधिकारी योगेश वाणी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी श्रीराम विद्यालयाचे सरस्वती पाटील, प्रतिभा पाटील, अतुल चाटे, भगवान लाडवंजारी आणि या.दे.पाटील विद्यालयात मुख्याध्यापक खंबायक, सर्वश्री वाणी, वाघ, सानप, लिंगायक, अहिराव, आदींचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here