चांदसरची कार्तिकी साळुंखे विक्रीकर निरीक्षकपदी

0
4

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील चांदसर येथील हायस्कूलचे उपशिक्षक प्रकाशचंद्र साळुंखे यांची कन्या तथा चोपडा तालुक्यातील वर्डी येथील स्व.व्यंकटराव त्र्यंबकराव पाटील गुरुजी यांची नात कार्तिकी साळुंखे हिची राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्य विक्रीकर निरीक्षकपदी (एसटीआय) नुकतीच निवड झाली आहे.

जळगाव येथील एसएसबीटी कॉलेजमधून बी. ई. झालेली कार्तिकी यापूर्वी तिची २०१८ साली सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी एसआयडीपदी निवड झाली होती. राज्य विक्रीकर निरीक्षकपदी नुकतीच जळगाव येथे रुजू झालेली कार्तिकी साळुंखे ही अजुनही मोठं स्वप्न पाहत राज्य सेवेची तयारी करत आहे. कार्तिकीला आई, वडील, भाऊ, मामा यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल तिचे गावासह सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here