चाळीसगाव महाविद्यालयात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक जयंती साजरी

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी. पी. आर्टस, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स आणि के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, उपप्राचार्य डॉ. के.एस.खापर्डे, कार्यक्रम समिती प्रमुख प्रा. अंकुश जाधव यांची उपस्थिती होती. याप्रसंगी उपप्राचार्य वासाईकर यांनी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील समिती सदस्य प्रा. किशोर पाटील, प्रा. पंकज नन्नवरे, प्रा.एम.ओ.अहिरे, डॉ. ए.ए.वनीकर, डॉ. दिपाली बंसवाल, प्रमोद पवार तसेच हेमंत गायकवाड, संजय जाधव विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अंकुश जाधव तर आभार हेमंत गायकवाड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here