जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे शिक्षक सन्मानासह रंगले कविसंमेलन

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या सत्कारासह कवी संमेलन रंगले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी तथा लेखक प्रा. वा. ना. आंधळे होते. ज्ञानदानाचे महान कार्य करणाऱ्या प्रा. प्रकाश महाजन, प्रा. वा. ना. आंधळे, प्रा. विजेंद्र पाटील, भास्करराव चव्हाण, विजय लुल्हे, गोविंद पाटील, अरूण वांद्रे यांचा मंडळातर्फे संस्थापक-अध्यक्ष गोविंद देवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणातून डॉ. राधाकृष्णन्‌‍‍ यांच्याबद्दल माहिती विषद केली. कविसंमेलनात सादर केलेल्या कवितांना उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.

कविसंमेलनात प्रा. वा. ना. आंधळे, प्रा. विजय लुल्हे, अरूण वांद्रे, किशोर गायकवाड, संतोष साळवे, पानाचंद चौधरी, निवृत्ती कोळी, श्रीमती मंदाकिनी मोरे, इंदिरा जाधव, अरूण जोशी, मोहनसिंग राजपूत यांनी कविता सादर केल्या. गोविंद देवरे यांनी ‘जात’ नावाची कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. प्रास्ताविकात मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष गोविंद देवरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन प्रा. विजेंद्र पाटील तर आभार भास्करराव चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here