गणपती नगरात महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा उत्साहात

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

पिंप्राळा परिसरातील गणपती नगरामधील महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा नुकतीच उत्साहात पार पडली. त्यानंतर सायंकाळी ६ ते १० वाजेदरम्यान, महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. पिंप्राळा ते सावखेडा रस्त्यावरील गणपती नगरात सायंकाळी महादेव पिंड, गणपती, नंदी व कासवाच्या मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सकाळापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत पूजा विधी व यज्ञ करण्यात आला. त्यानंतर आ.राजुमामा भोळे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तसेच माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे व आकाश पारधे यांनी जलाभिषेक करून उपस्थित भाविकांना रूद्राक्ष वाटप केले. यावेळी मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होती.

यशस्वीतेसाठी भैय्या पाटील, कुणाल राजपूत, दीपराज निकम, दीपक पाटील, अमोल सोनवणे, कमलेश पाटील, डॉ.गजानन भावसार, कैलास माळी, शुभम पारधी, तुषार पाटील, हर्षल सोनार, कैलास ठाकरे, पत्रकार नगराज पाटील, प्रा. अतुल पाटील, पद्माकर खैरनार, मनोज गुंजाळ, अजय मांडगे, संदीप पाटील, योगेश कोल्हे, विलास भालेराव, सचिन भालेराव, नरेंद्र कुंभार, शशीकांत धनगर, शिवम पाटील, दत्ता कोष्टी, दीपक बारी, पंढरीनाथ वारूळे, सचिन सोनार, मनोज धनगर, राम विसपुते, खेमचंद सुर्यवंशी, समाधान चांदेकर, लखन विसपुते, गजू बारी, रवींद्र पाटील, रवींद्र माळी, रवींद्र दांडगे, विजय जाधव, नरेंद्र मांडगे, नितीन बारी, योगेश मराठे, दीपक सपकाळे यांच्यासह कॉलनीतील तरुण, महिलांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here