Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या समाजकल्याण विभागाकडून प्रादेशिक उपायुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्यावतीने आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या नाशिक विभागातील विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन अहमदनगर येथे २८ ऑक्टोबर रोजी केले होते. स्पर्धेत मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव संघाने प्रत्येक सामन्यात वर्चस्व ठेऊन चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हा संघ १-० ने विजेता ठरला आहे. अध्यक्षस्थानी समाजकल्याण प्रादेशिकचे उपायुक्त माधव वाघ होते. स्पर्धेची सुरुवात फ्लँग मार्च आणि क्रीडा ज्योतने झाली. स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, धुळे या ५ जिल्ह्यातील ७…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे ,पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, राज्य सरकाने सोयाबिनच्या नुकसान भरपाईपोटी २५ टक्के शेतकऱ्यांना द्यावेत असे पत्र विमा कंपन्यांना दिले, पण ते पत्र या विमा कंपन्यानी केराच्या टोपलीत टाकले. विमा कंपन्या सरकारला भीक घालत नाहीत. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नाही तर पंतप्रधान मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी आहे, असा घणाघाती…

Read More

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी मेहकरहून भुसावळला जाणाऱ्या बसवर एकाने वरणगाव नजिकच्या सातमोरी पुलाजवळ दगडफेक केल्याने बसमधील एक पाच वर्षीय बालिका जख्मी झाली. तर बसच्या दोन काच फुटल्या आहेत. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे . मेहकर – भुसावळ बस (क्र. एमएच४० एन ९९४१) मेहकरवरून भुसावळला जात असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास विशाल संजय बोंडे हा महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल आमंत्रणच्या समोर दुचाकीवरून मोबाईलचे हेड फोन लावून बसच्या पुढे आला आणि दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करू लागला. याव्ोळी त्याला समजविण्यासाठी चालक व वाहक गेले असता त्याने दगडफेक सुरु केली. यामध्ये बसच्या दोन काच फुटल्या तसेच बसमधील प्रवाशी देवांशी…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथील पारोळा चौफुलीवर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. त्यात दुचाकीवरील साठ वर्षीय वयोवृद्ध ठार तर तरुणालाही गंभीर दुखापत झाली आहे. पारोळा चौफुलीवर झालेल्या जोरदार अपघातामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले. सविस्तर असे की, गोंडगावकडून कजगावकडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास निंबा भिवसन कोळी (वय ६०, रा.गुढे, ता.भडगाव) आणि प्रसाद रवींद्र चौधरी (वय १६, रा.पिलखोड, ता.चाळीसगाव) हे दोघे दुचाकीने (क्र.एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८) येत होते. तेव्हा त्यांना पुणे-एरंडोल ह्या कजगावकडून भडगावकडे जाणाऱ्या एस. टी. बस (क्र.एम.एच .२०…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर मराठा आरक्षण मिळण्यासाठी आणि मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा तसेच शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कजगाव येथील चौघांनी ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा मराठा समाज बांधवांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. यावेळी मराठा समाज बांधवांच्या घोषणांनी बस्थानक परिसर दणाणून गेले होते. तसेच येत्या दोन दिवसात बसस्थानक परिसरात साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा समाज बांधवांनी केली आहे. कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पवार, शोभाबाई बोरसे, पल्लवी पाटील यांनी आपला राजीनामा लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्याकडे सोपविला. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दिनेश पाटील यांनीही आपला राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी शिवसेनेचे राजेंद्र चव्हाण यांच्यामार्फत पुढे पाठविला आहे. यावेळी माजी…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील कोळगावला नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, या भावनेने गावाला वैशाली सूर्यवंशी आणि पाचोरा निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने सी. एस. आर. अंतर्गत आर. ओ. वॉटर सिस्टीम नुकतेच भेट म्हणून देण्यात आले. स्वच्छ पाणी नसल्यामुळे भरपूर आजार होतात. त्यामुळे नागरिकांची शारीरिक प्रकृती बिघडते म्हणून वॉटर सिस्टम भेट देण्यात आले. याप्रसंगी श्याम पाटील, कौतिक सोनवणे, पितांबर पवार, नाना सुखदेव पाटील, सरपंच महाजन, उपसरपंच गोपाल महाजन, संदीप महाजन, शिवाजी सोनवणे, आत्माराम ठाकरे, बापू पाटील, विकासोचे चेअरमन बी.डी.आर.पाटील, विजय वाघ, आबा उत्तम माळी, नाना जगन्नाथ पाटील, कपिल महाजन, दिलीप पाटील, भरत पाटील, नाना बारकू पाटील, दगडू माळी, शिवाजी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ओबीसीप्रमाणे तात्काळ सवलती द्या, जे १०० टक्के राज्य सरकारच्या अधिकारात आहे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व आंदोलनाचे गुन्हे (आंतरवाली सराटीसह) तात्काळ मागे घ्यावे आदी मागण्यांसाठी सकल मराठा समाज आणि संभाजी सेनेच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रमोद बापू पाटील, सरपंच गिरीश पाटील, जयसिंग भोसले, भाऊसाहेब पाटील, बाजार समितीचे संचालक राहुल पाटील, तमाल देशमुख, मनोज भोसले, सागर चौधरी, अरुण पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते. सरकारने मराठा समाजाचा आता अंत पाहू नये,…

Read More

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी शिवारातील शेतातील रस्ता मातीने बुजल्याच्या रागातून एका वृध्दाला दोन जणांनी काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, सुभाष पोपट मराठे (वय ७८, रा. दादाजी नगर, धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हे धरणगाव शिवारातील शेतातून जात असतांना शेतातील रस्ता मातीने बुजल्याच्या रागातून संदीप शांताराम मराठे, शांताराम पोपट मराठे आणि रूखमाबाई मराठे (तिघे रा. हनुमान नगर, जळगाव) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवंत न ठेवण्याची धमकी दिली.…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील भगिनी मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात आद्यकवी रामायणाचे रचिता महर्षी वाल्मिक जयंती आणि शरद पौर्णिमेचे औचित्य साधून कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक सोमाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा पीपल्स बँकेचे संचालक डॉ.आशिष गुजराथी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात परिषदेच्या शाखेचे कार्याध्यक्ष गोविंद गुजराथी यांनी महर्षी वाल्मिक यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच शरद पौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला साहित्य परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत नेवे, शाखा उपाध्यक्षा वैद्य प्राजक्ता महाले, सदस्या प्रिती सरवैय्या पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.बी.पाटील, साहित्यिक संजय बारी यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सर्वानुमते लोकनियुक्त सरपंच पदासह पाच ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात यश आले आहे. सरपंच पदासाठी वर्षा युवराज पाटील ह्या बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तसेच तिन्ही वार्डातील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यात वॉर्ड क्रमांक १ मधून लोटन भील, वॉर्ड क्रमांक २ मधून शोभाबाई गोकुळ पाटील, संतोष बापू चौधरी तर वॉर्ड क्रमांक ३ मधून कल्पना साहेबराव पाटील, अरुण संभाजी पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. वॉर्ड क्रमांक १ मध्ये दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. गावाचा विकास व्हावा या हेतूने संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे…

Read More