विकासासाठी पिंपळे खुर्द ग्रामपंचायत बिनविरोध

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी सर्वानुमते लोकनियुक्त सरपंच पदासह पाच ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात यश आले आहे. सरपंच पदासाठी वर्षा युवराज पाटील ह्या बिनविरोध लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तसेच तिन्ही वार्डातील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. त्यात वॉर्ड क्रमांक १ मधून लोटन भील, वॉर्ड क्रमांक २ मधून शोभाबाई गोकुळ पाटील, संतोष बापू चौधरी तर वॉर्ड क्रमांक ३ मधून कल्पना साहेबराव पाटील, अरुण संभाजी पाटील
हे बिनविरोध निवडून आले आहेत.

वॉर्ड क्रमांक १ मध्ये दोन जागांसाठी निवडणूक लागली आहे. गावाचा विकास व्हावा या हेतूने संपूर्ण ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक ३ मधील उमेदवार तथा शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पुनाजी पाटील यांच्या पत्नीची उमेदवारी मागे घेण्यात आली.

याप्रसंगी निंबा दला चौधरी, पुरुषोत्तम लोटन चौधरी, भाऊसाहेब अप्पा पाटील, जयवंतराव दगा पाटील, भीमराव नारायण पाटील, निंबा दयाराम चौधरी, नारायण दामू पाटील, न्हान हिलाल पाटील, विनोद नाना पाटील, सुदाम बळीराम पाटील, गणेश मोतीराम पाटील, प्रकाश दिगंबर पाटील, छोटु पाटील, अरुणाबाई दगा पाटील, सुरेखा जयवंत पाटील, कविता संभाजी पाटील, वैशाली विनोद पाटील, वैशाली रवींद्र पाटील, विजय शशिकांत पवार यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here