कजगावला दुचाकी-बसच्या अपघातात वयोवृद्ध ठार

0
1

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

येथील पारोळा चौफुलीवर एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. त्यात दुचाकीवरील साठ वर्षीय वयोवृद्ध ठार तर तरुणालाही गंभीर दुखापत झाली आहे. पारोळा चौफुलीवर झालेल्या जोरदार अपघातामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.

सविस्तर असे की, गोंडगावकडून कजगावकडे दुपारी दोन वाजेच्या सुमारास निंबा भिवसन कोळी (वय ६०, रा.गुढे, ता.भडगाव) आणि प्रसाद रवींद्र चौधरी (वय १६, रा.पिलखोड, ता.चाळीसगाव) हे दोघे दुचाकीने (क्र.एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८) येत होते. तेव्हा त्यांना पुणे-एरंडोल ह्या कजगावकडून भडगावकडे जाणाऱ्या एस. टी. बस (क्र.एम.एच .२० बी.एल.२६५२) आणि दुचाकीत धडक झाली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांसह नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर अपघातातील तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here