वरणगावात बसवर दगडफेक

0
3

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

मेहकरहून भुसावळला जाणाऱ्या बसवर एकाने वरणगाव नजिकच्या सातमोरी पुलाजवळ दगडफेक केल्याने बसमधील एक पाच वर्षीय बालिका जख्मी झाली. तर बसच्या दोन काच फुटल्या आहेत. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे .

मेहकर – भुसावळ बस (क्र. एमएच४० एन ९९४१) मेहकरवरून भुसावळला जात असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास विशाल संजय बोंडे हा महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल आमंत्रणच्या समोर दुचाकीवरून मोबाईलचे हेड फोन लावून बसच्या पुढे आला आणि दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करू लागला. याव्ोळी त्याला समजविण्यासाठी चालक व वाहक गेले असता त्याने दगडफेक सुरु केली. यामध्ये बसच्या दोन काच फुटल्या तसेच बसमधील प्रवाशी देवांशी स्वप्नील सुलताने ( वय ५, रा. गुंजखेडा, ता.लोणार, जि. बुलढाणा) या बालिकेच्या डोक्यावर दगड लागल्याने ती गंभीर जख्मी झाली तर संशयित विशाल बोंडे याने वाहक योगेश सावळे यांना सुद्धा मारहाण केली. याप्रकरणी बस चालक योगेश यशवंत सावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here