कजगावला मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दिला राजीनामा

0
1

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर

मराठा आरक्षण मिळण्यासाठी आणि मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा तसेच शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कजगाव येथील चौघांनी ठरल्याप्रमाणे आपला राजीनामा मराठा समाज बांधवांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. यावेळी मराठा समाज बांधवांच्या घोषणांनी बस्थानक परिसर दणाणून गेले होते. तसेच येत्या दोन दिवसात बसस्थानक परिसरात साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा मराठा समाज बांधवांनी केली आहे.

कजगाव ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान पवार, शोभाबाई बोरसे, पल्लवी पाटील यांनी आपला राजीनामा लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्याकडे सोपविला. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दिनेश पाटील यांनीही आपला राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी शिवसेनेचे राजेंद्र चव्हाण यांच्यामार्फत पुढे पाठविला आहे.

यावेळी माजी सरपंच निवृत्ती पवार, रघुनाथ पवार, हरी बोरसे, दशरथ पाटील, गरबड बोरसे, ज्ञानेश्वर पाटील, सोपान पवार, अनिल पाटील, चेतन पवार, विनोद पाटील, राहुल पाटील, पप्पू बोरसे, रवींद्र साठे, पंढरीनाथ पवार, प्रणव शिंदे, परमेश्वर पाटील, पिंटू पाटील, जिभु पाटील, राकेश पाटील, भोला फरताडे, बाबाजी पाटील, ईश्वर बोरसे, गोविंद पवार, मराठा समाज बांधवांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here