चोपड्यात महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्त अभिवादन

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील भगिनी मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात आद्यकवी रामायणाचे रचिता महर्षी वाल्मिक जयंती आणि शरद पौर्णिमेचे औचित्य साधून कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक सोमाणी होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा पीपल्स बँकेचे संचालक डॉ.आशिष गुजराथी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात परिषदेच्या शाखेचे कार्याध्यक्ष गोविंद गुजराथी यांनी महर्षी वाल्मिक यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच शरद पौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाला साहित्य परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकांत नेवे, शाखा उपाध्यक्षा वैद्य प्राजक्ता महाले, सदस्या प्रिती सरवैय्या पाटील, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.बी.पाटील, साहित्यिक संजय बारी यांच्यासह शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक तथा आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here