साईमत, चोपडा : प्रतिनिधी शेतकऱ्यांना (कुणबी) लुटून सरकारांनी देशोधडीला लावले. आता शिक्षण आणि पोटापाण्यासाठी आरक्षण मागण्याची वेळ त्यांच्यावर आणली. सर्व कायदेशीर कागदपत्रे असूनही त्यांना आरक्षण न देणे हे घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात टिकणारे आरक्षण देवू, कित्येक वर्षे हाच खेळ सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देवून घटनेसह शपथेचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान करावा. मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत लढत आहेत. कित्येक तरुणांनी समर्थनार्थ आत्महत्या केल्या. पण राजकारण्यांना भावना नसाव्यात त्यांना प्रत्येक घटनेत राजकारण दिसत आहे. हे सर्व थांबवून तात्काळ निर्णय घ्यावा, मराठा बांधव शांततेत आंदोलन करीत आहेत. कुणीतरी भडकावणारे लोक जाळपोळ करीत आहेत. संयमाने आंदोलने करणाऱ्यांचा सरकारने अंत पाहू नये,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खडकी बु.ला महिला व बाल भवनात राममंदिरासमोर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा व उच्चाटन अध्यादेश २०१३ कायद्याला १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कायद्याविषयी जनजागृतीसाठी राज्यव्यापी जनसंवाद यात्रा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात प्रचार व प्रसार करीत आहे. त्यानिमित्त यात्रेच्या समन्वयक नंदिनी जाधव, पुणे (राज्य कार्यकारिणी सदस्य म.अ.नि.स.) यांनी साध्या सोप्या भाषेत कायदा व त्यातील कलम याविषयी विस्तृत मांडणी करत प्रबोधन केले. प्रारंभी भगवान रणदिवे, सातारा यांनी चमत्कार सादरीकरण करून त्यात वैज्ञानिक प्रयोग व हातचलाखी करून बुवा बाबा कशा प्रकारे गंडावतात यासंदर्भात प्रबोधन केले. यावेळी जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा वाहनाचे स्वागत पोलीस पाटील…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर चांदसर येथील मंडळ अधिकाऱ्यांनी बांभोरी नदीपात्रातून पकडले होते. ते ट्रॅक्टर धरणगाव तहसील कार्यालयात घेवून जात असताना पोलिसांची नजर चुकवून ट्रॅक्टर चालक फरार झाला. याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. महसूल विभागाच्या गौण खनिज वाहतूक प्रतिबंध पथकात काम करणारे चांदसर भागाचे मंडळ अधिकारी अविनाश पांडुरंग पाटील, धरणगाव पो.स्टे.चे पो.हे.कॉ.प्रदीप सोनवणे यांना बांभोरीचे तलाठी विरेंद्र सोनकांबळे यांचा भ्रमणध्वनीद्वारे फोन आला होता. त्यांनी स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जात असल्याची माहिती देऊन त्यात वाळू असल्याचे सांगितले. त्यावरुन ट्रॅक्टरचा पाठलाग करून ते पकडले. तेव्हा चालकाने त्याचे नाव आणि गाव सांगण्यास नकार…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला गावातील ग्रामपंचायत प्रशासनाकडून संगणक, प्रिंटर व स्पिकर, साऊंड सिस्टीम आदी साहित्य नुकतेच भेट देण्यात आले. शाळा डिजिटल करून दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शाळा व्यवस्थापन समितीने एकमुखी निर्णय घेतला आहे. या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने साहित्य देऊ केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत शालेय साहित्य मुख्याध्यापक प्रवीण तायडे यांच्या सुपूर्द करण्यात आले. शालेय प्रशासनाच्यावतीने सरपंच प्रियंका चव्हाण, उपसरपंच संदीप राठोड, ग्रामपंचायत सदस्य चेतन चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, ग्रामसेवक राजेश म्हस्के, पोलीस पाटील इंदल चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, बालचंद चव्हाण यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील राजपूत मंगल कार्यालयात सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत सेवा सहयोग फाउंडेशन व भूजल अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन, लेखन प्रशिक्षणाचे आयोजन केले हेोते. चाळीसगाव तालुक्यातील ३२ शाळांमध्ये वाचन व लेखन हा ९० दिवसांचा उपक्रम आखण्यात आला. उपक्रमास ६६ दिवस पूर्ण झाले. उपक्रमाअंतर्गत ३२ शाळेतील शिक्षकांसाठी आणि चाळीसगाव तालुक्यातील भडगाव, पाचोरा तालुक्यातील सर्व शिक्षकांसाठी दुसरे प्रशिक्षण घेण्यात आले होते. अध्यक्ष, प्रमुख पाहुण्यांची औपचारिकता, शिक्षकांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी कुणाचे आदेश नसल्यावरही रविवारच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत साधारण ४०० शिक्षकांनी वाचन व लेखन उपक्रमाचे प्रशिक्षण घेतले. शिक्षकांची मेहनत आणि तळमळ भारावून टाकणारी होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिंदी येथे मराठा समाजाच्यावतीने नवनाथ रंगनाथ मांडे, राकेश रमेश देशमुख, भाऊसाहेब नाना नवले हे रविवारी, २९ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणास बसले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले. उपोषणाला सरपंच सरुबाई आप्पासाहेब जाधव, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बाळू पिलोरे, पंकज कैलास गरुड, मा. सरपंच सुरेश सुखदेव गजे, राजू भरत कोकणे, राजेंद्र नंदलाल तिकांडे, समाजसेवक ज्ञानेश्वर रतन ठाकरे, पुंडलिक जनार्दन देशमुख, स्वप्निल सुभाष देशमुख, दिलीप माधव कोकणे, दत्तात्रय महादेव कोकणे, भागवत रघुनाथ कोंढरे, राहुल दिलीप दौंड, गजानन साहेबराव चव्हाण, सौरभ शामराव दौंड, बबलू अनिल गरुड, आदित्य शशिकांत कोकणे, प्रवीण विजय फटांगरे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिंदी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचा आवलीबाई धर्मा राठोड यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कार्यवाही केली होती. त्यामुळे शिंदी ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर मंगळवारी, २३ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने चाळीसगावचे तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अध्यासी अधिकारी विनोद कुमावत सर्कल यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑक्टोबर रोजी सभा पार पडली. सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा कालावधी होता. १२ ते २ सभेच्या दरम्यान एकच फॉर्म सादर झाला. मतदानावेळी १२ पैकी १० मते सरूबाई आप्पासाहेब जाधव यांना मिळाले. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध केल्याचे घोषित केले. त्यामुळे शिंदी गु्रप ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकला आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चामुंडा माता मंदिरासमोरील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसह दुरुस्तीसाठी महिलांसह वार्डातील नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन दिले. शहरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेअभावी घाण पसरली आहे. त्याचा परिणामही आरोग्यावर होत आहे. यामुळे जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. महिलांच्या शौचालयाची त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणीही नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महिलांची शौचालये स्वच्छ केलेली नाहीत. याठिकाणी निधी उपलब्ध करून अन्य ठिकाणी नवीन शौचालय बांधुन द्यावी, वार्डातील मंदिरासमोरील महिलांची सार्वजनिक शौचालयाची कमीत कमी दोन वर्षापासून स्वच्छता झालेली नाही. दोन वर्षापूर्वी चाळीसगाव शहरात सातवेळा महापूर आला होता. तेव्हापासून आजतागायत महिलांची शौचालये कधीच स्वच्छ केलेली नाही. त्यामुळे शौचालयात जातांना महिलांना अनेक समस्यांना…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा आणि भडगाव तालुक्याला सामाजिक बांधिलकीतून ‘डास मुक्त’ करण्यासाठी शिवसेना उबाठाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी फवारणीचा उपक्रम सुरु केला आहे. त्याची सुरुवात पाचोरा शहरातून २३ ऑक्टोबरपासून सुरु केली आहे. ‘डासमुक्त शहर’ संकल्पना वैशाली सूर्यवंशी यांनी स्वखर्चातून राबवून सेवाभावी उपक्रम जपला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील डेंग्यूची लागण नियंत्रणात आणण्यासाठी तथा नागरिकांचे तसेच त्यांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी (आरोग्य तुमचे काळजी आमची) सामाजिक बांधिलकीतून पाचोरा येथील निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून वैशाली सूर्यवंशी यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल फवारणी झालेल्या भागातील परिसरातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. नागरिकांना डासापासून मुक्ती भेटत आहे. अशाही प्रतिक्रिया…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी संपूर्ण मराठा समाजाविरोधात अपशब्द वापरणारा नारायण राणे तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे, गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम, सदाभाऊ खोत, छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी, २९ रोजी दहन करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण मराठा समाजाविरोधात नारायण राणे याने अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रात मराठा समाज नारायण राणे यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाला आहे. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे, गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम, सदाभाऊ खोत तसेच अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या झालेल्या सभेला पैसा कुठून येतो, असे बेताल वक्तव्य करणारे छगन भुजबळ…