मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन

0
13

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

संपूर्ण मराठा समाजाविरोधात अपशब्द वापरणारा नारायण राणे तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे, गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम, सदाभाऊ खोत, छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी, २९ रोजी दहन करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

संपूर्ण मराठा समाजाविरोधात नारायण राणे याने अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रात मराठा समाज नारायण राणे यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाला आहे. तसेच मराठा आरक्षणाला विरोध करणारे नारायण राणे, गुणरत्न सदावर्ते, रामदास कदम, सदाभाऊ खोत तसेच अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या झालेल्या सभेला पैसा कुठून येतो, असे बेताल वक्तव्य करणारे छगन भुजबळ यांच्या पुतळ्याचे दहन चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २९ रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.

यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘दुरी तिरी एक्का नारायण राणे छक्का’, ‘पाऊस पडला गाराचा रामदास कदम बाराचा’, ‘सदावर्तेचे करायचे काय, खाली डोक वरती पाय’, ‘सदाभाऊ खोत मुर्दाबाद’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे’, ‘कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी गणेश पवार म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या पाच रावणांचा पुतळा सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळण्यात आला आहे. या मराठा समाजद्रोहींनी मराठा समाजाविरोधात जर यापुढे अपशब्द वापरले आणि आरक्षणाला विरोध केला तर यांना घरी जाऊन ठेचल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.

प्रमोद पाटील म्हणाले की, नारायण राणे, गुणरत्न सदावर्ते यांचे बक्षिसे मिळविण्यासाठी आणि वतने टिकविण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाला वेगळे वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यांना वतन देणाऱ्यांना समाज यापुढे धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. समाज आरक्षणासाठी एक संघ झाला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे सांगितले.

लक्ष्मण शिरसाठ म्हणाले की, पाच रावणांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने त्यांचा जाहीर निषेध करतो. मराठा समाजाविषयी अपशब्द वापरणारे नारायण राणे तसेच मराठा द्रोहींचे वागणे बदलले नाही तर मराठा समाज यांना प्रत्यक्षात गाड्यासह जाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी अरुण पाटील, गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, प्रमोद पाटील, प्रशांत गायकवाड, प्रा.तुषार निकम, खुशाल बिडे, खुशाल मराठे, माजी सैनिक आबासाहेब गरुड, जी.जी.वाघ, तमाल देशमुख, दादा पाटील, नंदकिशोर जाधव, ॲड.विलास पाटील, मनोज भोसले, विकास पवार, सुनील पाटील, सिद्धार्थ देशमुख, सागर पाटील, सतीश पवार, अविनाश काकडे, सुदर्शन देशमुख, दत्ता पवार, किरण आढाव, संतोष फडतरे, विकास पाटील, दीपक पाटील, अनिल कवडे, छोटू अहिरे, गुड्डू पगार, प्रा.चंद्रकांत ठाकरे, अनिल पाटील, अरविंद पाटील, किशोर देशमुख, चेतन देशमुख, प्रदीपराव देशमुख, सचिन पवार, सुनील पवार, शरद पवार, किरण पवार, स्वप्नील गायकवाड, किरण देशमुख, गोरख साळुंखे, भूषण पाटील, विजय सुरेश गायकवाड यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here