शिंदी ग्रुप ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील शिंदी गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचा आवलीबाई धर्मा राठोड यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्रतेची कार्यवाही केली होती. त्यामुळे शिंदी ग्रामपंचायतीचे सरपंच पद रिक्त झाले होते. त्यानंतर मंगळवारी, २३ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने चाळीसगावचे तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अध्यासी अधिकारी विनोद कुमावत सर्कल यांच्या अध्यक्षतेखाली २३ ऑक्टोबर रोजी सभा पार पडली. सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा कालावधी होता. १२ ते २ सभेच्या दरम्यान एकच फॉर्म सादर झाला. मतदानावेळी १२ पैकी १० मते सरूबाई आप्पासाहेब जाधव यांना मिळाले. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध केल्याचे घोषित केले. त्यामुळे शिंदी गु्रप ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा फडकला आहे.

यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य पंकज कैलास गरुड, कैलास सावजी राठोड, भारती समाधान राठोड, सुरेखा ज्ञानेश्‍वर पिलोरे, दीपाली नामदेव तिकांडे, अहिल्याबाई भास्कर सोनवणे, आशाबाई दिलीप कोकणे, संजीवनी जाधव, राहुल ठाकरे, अधिकारी, कर्मचारी वर्ग, अध्यक्ष निवडणूक अधिकारी विनोद कुमावत, ग्रामसेवक सी.बी. साळुंखे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सुरेश अप्पा गजे, कैलास गरुड, ज्ञानेश्‍वर ठाकरे, काशिनाथ सोनवणे, नारायण तिकांडे, राजू कोकणे, सुनील कोकणे, राजू नंदू तिकांडे, अनिल मुकदम, अशोक राठोड, भाऊसाहेब नवले, गोकुळ फटांगरे, विजू बापू फटांगरे आदी उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त सरपंच यांनी गावाच्या विकासात सर्वतोपरी कार्य करेल आणि गावाच्या विकासात कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता सर्वांनी हातभार लावावा, असे आव्हान त्यांनी करुन आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here