साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला गावातील ग्रामपंचायत प्रशासनाकडून संगणक, प्रिंटर व स्पिकर, साऊंड सिस्टीम आदी साहित्य नुकतेच भेट देण्यात आले. शाळा डिजिटल करून दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शाळा व्यवस्थापन समितीने एकमुखी निर्णय घेतला आहे. या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांचे प्रयत्न पाहून ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने साहित्य देऊ केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत शालेय साहित्य मुख्याध्यापक प्रवीण तायडे यांच्या सुपूर्द करण्यात आले. शालेय प्रशासनाच्यावतीने सरपंच प्रियंका चव्हाण, उपसरपंच संदीप राठोड, ग्रामपंचायत सदस्य चेतन चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, ग्रामसेवक राजेश म्हस्के, पोलीस पाटील इंदल चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, बालचंद चव्हाण यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण तायडे यांनी मनोगतात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. पालकांनी शाळेत झालेल्या घटकाची पुनरावृत्ती करावी. भविष्यातही असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. यशस्वीतेसाठी अरुण चौधरी, जयश्री गोरे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन श्रीकृष्ण गीते यांनी केले.