मराठा समाजाला आरक्षण देवून घटनेसह शपथेचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान करावा

0
40

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शेतकऱ्यांना (कुणबी) लुटून सरकारांनी देशोधडीला लावले. आता शिक्षण आणि पोटापाण्यासाठी आरक्षण मागण्याची वेळ त्यांच्यावर आणली. सर्व कायदेशीर कागदपत्रे असूनही त्यांना आरक्षण न देणे हे घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगतात टिकणारे आरक्षण देवू, कित्येक वर्षे हाच खेळ सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देवून घटनेसह शपथेचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान करावा. मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत लढत आहेत. कित्येक तरुणांनी समर्थनार्थ आत्महत्या केल्या. पण राजकारण्यांना भावना नसाव्यात त्यांना प्रत्येक घटनेत राजकारण दिसत आहे. हे सर्व थांबवून तात्काळ निर्णय घ्यावा, मराठा बांधव शांततेत आंदोलन करीत आहेत. कुणीतरी भडकावणारे लोक जाळपोळ करीत आहेत. संयमाने आंदोलने करणाऱ्यांचा सरकारने अंत पाहू नये, असेही निवेदनात नमूद केले आहे. तसेच चोपडातील मराठा समजा बांधवांनी निवेदनाद्वारे आक्रोश व्यक्त केला आहे. याप्रसंगी सर्व समाजबांधव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा असून त्यांच्या तब्येतीसाठी भगवंताला प्रार्थना केली.

यावेळी ॲड.संदीप पाटील, घनश्‍याम पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, एस.बी.पाटील, शशिकांत पाटील, शशिकांत देवरे, गिरीश पाटील, रमेश सोनवणे, प्रा.प्रदीप पाटील, डॉ.रवींद्र पाटील, डॉ.रोहन पाटील, डॉ.रवींद्र निकम, अजित पाटील, रणजित निकम, देविदास सोनवणे, ॲड.कुलदीप, भगवान पाटील, भागवत पाटील, रमाकांत पाटील, तुकाराम पाटील, भटू पाटील, प्रमोद बोरसे, दिव्यांक सावंत, रत्नाकर बाविस्कर, ॲड.चंद्रशेखर निकम, दिनेश बाविस्कर, संजय पाटील, आर.एच.बाविस्कर, भास्कर पाटील, मनोज निकम, मधुकर पाटील, धनंजय पाटील, संदीप बोरसे, सुनील देशमुख, ॲड.एस.डी. पाटील, नितेश पाटील, एस.टी.पाटील, श्रीकांत पाटील, सागर पाटील, सतीश बोरसे, दिनेश पाटील, मनोज पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here