Author: Sharad Bhalerao

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथील श्री गजानन महाराज मंदिराला शुक्रवारी, २६ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सप्ताहाचे आयोजन केले होते. यानिमित्त २० ते २७ जानेवारी २०२४ पर्यंत आत्मारामानंद महाराज वृंदावन यांची भागवत कथा महाराजांच्या मधुर वाणीतून ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भक्तांनी श्रवण केली. तसेच सात दिवस किर्तन, भजन, हरिपाठाचा आनंद घेतला. ह. भ. प. अविनाश महाराज चौधरी, नाचणखेडा, ह.भ.प. मुकुंद महाराज, नांद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन मोलाचे ठरले. तसेच अविनाश महाराजांनी आजच्या युवा पिढीने एकत्र येऊन धार्मिक व सामाजिक कार्य करावे. गावात वेगळे असलेले मित्र मंडळ एकच मित्र मंडळ करावे, असे आव्हान केले. महाप्रसादचे अन्नदान श्री धनराज…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कुल येथे इयत्ता सहावीच्या इंग्रजी विषयातील ‘ॲट द सायन्स’ पाठातील ‘पेपर मार्बलिंग’ घटकावर आधारित प्रात्यक्षिकाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे घेता आला. इंग्रजी, सायन्स आणि चित्रकला या तीनही विषयांची सांगड घालत उपक्रम राबविण्यात आला. सायन्समधील तेल पाण्यावर तरंगते ह्या गुणधर्माचा वापर करून रंगाची सांगड घालून इंग्रजीमधील पाठाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन प्रत्यक्ष कृती करून दाखविली. पेपर मॉडेलिंग गुणधर्म विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्रात्यक्षिक आधारे विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा पाटील, इंग्रजी शिक्षिका वैशाली कुमावत, शितल महाजन यांनी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी चार पोलीस चौक्यांचे बांधकाम व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन आ.मंगेश चव्हाण आणि जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते केले होते. अवघ्या पाच महिन्यात चारही पोलीस चौक्यांचे काम पूर्ण करून प्रजासत्ताक दिनाच्या दोनच दिवसानंतर रविवारी, २८ जानेवारी २०२४ रोजी आ.मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे चाळीसगाव वासियांना आता पोलिसांचे चारही बाजुंनी सुरक्षा कवच मिळणार आहे. चाळीसगाव आपले शहर, गाव, तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते. मात्र, पोलीस प्रशासनाला अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार मिळाला तर काय…

Read More

साईमत, रावेर : प्रतिनिधी येथील श्री शिव प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर शाळेत शनिवारी, २७ जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा आणि हळदी कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करणारे निरागस चेहरे व आदरतिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काहीतरी घेण्याचा मोह आवरता आला नाही. आनंद मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पालकांनीही हजेरी लावली होती. तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, माता पालक यांनीही आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतला. मेळाव्यात चाळीस प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले होते. वस्तु खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. खरी कमाई अंतर्गत इयत्ता दहावीचे स्काऊट गाईडचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. तसेच हळदीकुंकू कार्यक्रमासाठी मातापालकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी यावल पूर्व आणि पश्‍चिम वन विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सागवान लाकडासह ‘खैर’ लाकडाची अवैध तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यावल वन विभागातील यावल येथील पूर्व व पश्‍चिम वन विभागात खैर लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. मौल्यवान अशा खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या १० वाहनामागे फक्त १ वाहन पकडण्याचा देखावा वन विभागाकडून होत आहे. त्यामुळे मौल्यवान ‘काथ’ बाजारात आणि शासनाला कोट्यावधी रुपयाचा ‘चुना’ लावण्याचा प्रकार सातपुड्यात होत असल्याचे उघड उघड चर्चिले जात आहे. सविस्तर असे की, जानेवारी २०२४ महिन्याच्या सुरुवातीला यावल पश्‍चिम वन विभागात अवैध खैर लाकडाचे वाहतूक करतानाचे बोलोरो वाहन वन विभागाने पकडले होते. त्यानंतर…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा समाज बांधवातर्फे परिवर्तन चौकात महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी माल्यार्पण केले. सहभागी १२ बलुतेदार व १८ पगड जातींच्या लोकांनी एकत्र येऊन मराठा बांधवांसोबत गुलाल उधळून व फटाके फोडून नुकताच जल्लोष साजरा केला. तसेच मराठा सेवा संघ आणि मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवा गुर्जर समाजाचे युवा नेते श्रीकांत पाटील, मुस्लिम समाजाचे अफसर खान, शकूर जमादार, सलीम खान, युनूस खान, शकील मेंबर, मुस्लिम मनियार बिरारीचे युवा नेते हकीम चौधरी, कोळी…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील सुनील जोशी क्रेटर्स हे आपल्या छोटा हत्ती गाडीतून चोपड्यातील समारंभातील भोजनाचा कार्यक्रम आटोपून अमळनेरकडे येत होते. गाडीत सात जण होते. पातोंडाजवळ विसपुते गॅस एजन्सीजवळ शनिवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर व छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात होऊन छोटा हत्ती उलटला. त्यात निर्मलाबाई गोकुळ चौधरी ह्या जागीच ठार झाल्या. जखमींपैकी एकाला धुळ्याला उपचारासाठी रवाना केले आहे. उर्वरित पाच जण डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे उपचार घेत आहे. अपघातातील जखमींमध्ये सुनील जोशी (वय ५२), दिनेश सुभाष लांडगे (वय ४०), भावेश कैलास मिस्त्री (वय १८), लिलाबाई ओंकार कोळी (वय ६८) आणि आयसीयुमध्ये मंगलाबाई महाजन ह्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी १४ वर्षाच्या आतील ६७ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा आयुष दीपक सोनवणे याची स्तुत्य निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे ६७ वी १४ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा शिबिराचे आयोजन केले आहे. जळगाव येथे २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी आयुष दीपक सोनवणे महाराष्ट्राच्या संघात खेळणार आहे. अशा आशयाचे पत्र त्याला नुकतेच प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे येत्या ३ ते ६ फेब्रुवारी…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येत्या २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत येथील पू. सानेगुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय येथे पार पडत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली आहे. संमेलन अविस्मरणीय ठरावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांचे सहकार्य व योगदानातून साहित्य संमेलन निश्‍चितच यशस्वी होईल, असा विश्‍वास ९७ व्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केला. साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतांना ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. १९५२ मध्ये ज्या जागेवर साहित्य…

Read More

साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलेले असतानाही येथील शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस आपल्या हक्काच्या मूलभूत सोयी सुविधांपासून अद्यापही दूर आहे. रस्ते नाहीत, पाणी नाही, पिकाला भाव नाही, शेती पीक विम्याचा मोबदला नाही. एकूणच चोपडा तालुका हा राजकीय अनास्थेचा बळी ठरला असल्याचे परखड मत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांनी व्यक्त केले. तसेच रहिवाश्‍यांना आता न्याय मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या चोपडा येथील गौतम नगर या अतिक्रमित जागेच्या प्रश्‍नावर भेट देण्यासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अतिक्रमण कोणत्याही जागेवर असो ते तात्काळ काढता येत नाही. त्याला कायद्याने पंधरा दिवसांच्या अंतराने तीन नोटीसा दिल्या पाहिजेत.…

Read More