साने गुरुजी विद्यालयाचा खेळाडू आयुष सोनवणे राष्ट्रीय पातळीवर

0
6

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

१४ वर्षाच्या आतील ६७ वी राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा आयुष दीपक सोनवणे याची स्तुत्य निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे ६७ वी १४ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा शिबिराचे आयोजन केले आहे. जळगाव येथे २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. त्यात अमळनेर येथील साने गुरुजी विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी आयुष दीपक सोनवणे महाराष्ट्राच्या संघात खेळणार आहे. अशा आशयाचे पत्र त्याला नुकतेच प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्पर्धा छत्तीसगड येथे येत्या ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. आयुष हा अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दीपक बुधा सोनवणे यांचा चिरंजीव आहे.

आयुषला जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप तळवेलकर, सॉफ्टबॉल निवड समितीचे प्रमुख किशोर चौधरी, शाळेतील शिक्षक संदीप घोरपडे, विलास चौधरी, रवींद्र कोळी, देवदत्त पाटील, भरत सूर्यवंशी, जयेश मासरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल अमळनेरसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी त्याचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here