रावेरला सरस्वती विद्यामंदिरात बाल आनंद मेळाव्याची धूम

0
1

साईमत, रावेर : प्रतिनिधी

येथील श्री शिव प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर शाळेत शनिवारी, २७ जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा आणि हळदी कुंकूवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

याप्रसंगी स्टॉलवर आलेल्या ग्राहकांचे स्वागत करणारे निरागस चेहरे व आदरतिथ्य पाहून मोठ्यांनाही क्षणभर काहीतरी घेण्याचा मोह आवरता आला नाही. आनंद मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पालकांनीही हजेरी लावली होती. तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, माता पालक यांनीही आनंद मेळाव्याचा आस्वाद घेतला. मेळाव्यात चाळीस प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले होते. वस्तु खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. खरी कमाई अंतर्गत इयत्ता दहावीचे स्काऊट गाईडचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.

तसेच हळदीकुंकू कार्यक्रमासाठी मातापालकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. मनोरंजनात्मक खेळ मातृशक्तीसाठी घेण्यात आले. हळदी कुंकूवाचे वाण लुटल्यानंतर खाद्यपदार्थांचाही आस्वाद माता-भगिनींनी घेऊन मनमुराद आनंद लुटला. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित पालक कुंदन गजरे, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here