गो.से.हायस्कुलमधील विद्यार्थ्यांसमोर ‘पेपर मार्बलिंग’ प्रात्यक्षिक सादर

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कुल येथे इयत्ता सहावीच्या इंग्रजी विषयातील ‘ॲट द सायन्स’ पाठातील ‘पेपर मार्बलिंग’ घटकावर आधारित प्रात्यक्षिकाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे घेता आला. इंग्रजी, सायन्स आणि चित्रकला या तीनही विषयांची सांगड घालत उपक्रम राबविण्यात आला. सायन्समधील तेल पाण्यावर तरंगते ह्या गुणधर्माचा वापर करून रंगाची सांगड घालून इंग्रजीमधील पाठाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन प्रत्यक्ष कृती करून दाखविली. पेपर मॉडेलिंग गुणधर्म विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव प्रात्यक्षिक आधारे विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा पाटील, इंग्रजी शिक्षिका वैशाली कुमावत, शितल महाजन यांनी विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना प्रत्यक्षात त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक प्रीतमसिंग पाटील, कलाशिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना विविध रंगसंगतीच्या आधारे ऑइल पेंट कलरचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी इयत्ता सहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचा आनंद घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. कार्यक्रमाला सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन रवींद्र बोरसे तर आभार संदीप मनोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here