पातोंडाजवळील अपघातात महिला जागीच ठार, सहा जखमी

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील सुनील जोशी क्रेटर्स हे आपल्या छोटा हत्ती गाडीतून चोपड्यातील समारंभातील भोजनाचा कार्यक्रम आटोपून अमळनेरकडे येत होते. गाडीत सात जण होते. पातोंडाजवळ विसपुते गॅस एजन्सीजवळ शनिवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर व छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात होऊन छोटा हत्ती उलटला. त्यात निर्मलाबाई गोकुळ चौधरी ह्या जागीच ठार झाल्या. जखमींपैकी एकाला धुळ्याला उपचारासाठी रवाना केले आहे.

उर्वरित पाच जण डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे उपचार घेत आहे. अपघातातील जखमींमध्ये सुनील जोशी (वय ५२), दिनेश सुभाष लांडगे (वय ४०), भावेश कैलास मिस्त्री (वय १८), लिलाबाई ओंकार कोळी (वय ६८) आणि आयसीयुमध्ये मंगलाबाई महाजन ह्यांच्यावर उपचार सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here