मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा मुक्ताईनगरला जल्लोष

0
1

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

मराठा बांधवांना आरक्षण मिळाल्याबद्दल मराठा समाज बांधवातर्फे परिवर्तन चौकात महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी माल्यार्पण केले. सहभागी १२ बलुतेदार व १८ पगड जातींच्या लोकांनी एकत्र येऊन मराठा बांधवांसोबत गुलाल उधळून व फटाके फोडून नुकताच जल्लोष साजरा केला. तसेच मराठा सेवा संघ आणि मुक्ताईनगर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी पाठिंबा आणि सहकार्य करणाऱ्या समाज बांधवांचा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा गुर्जर समाजाचे युवा नेते श्रीकांत पाटील, मुस्लिम समाजाचे अफसर खान, शकूर जमादार, सलीम खान, युनूस खान, शकील मेंबर, मुस्लिम मनियार बिरारीचे युवा नेते हकीम चौधरी, कोळी समाजाचे पंकज कोळी, भोई समाजाचे छोटू भोई, शहा समाजाचे जाफर अली, सर्व मान्यवरांचा मराठा सेवा संघ व सकल मराठा समाजाच्यावतीने सत्कार केला.

याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आनंदराव देशमुख, मराठा सेवा संघाचे वस्तीग्रह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कदम, साहेबराव पाटील, दिलीप पाटील, प्रफुल्ल पाटील, दिलीप पाटील, नगरसेवक संतोष मराठे, सुभाष बनिय, जाणता राजा ग्रुपचे गणेश घाईट, गौरव दुपटे, पप्पू मराठे, सोपान मराठे, विनोद पाटील, गोलू मोहरे, निलेश भगत, वैभव भगत, राजू तुकाराम भगाळे, किष्णा पाटील, वैभव पाटील तसेच समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here