साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन शुक्रवारी, २ फेबु्रवारी २०२४ रोजी सत्रासेन गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या एक कौलारु घरात मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तेथील पोलीस पाटील यांना सोबत घेऊन छापा टाकून झडती घेतली. छाप्यात साग चौपट नग-(पलंग सह)-५३, घ. मी.०.४०१ इलेक्ट्रिक कटर मशिन नग-०१, इतर साहित्य आढळून आले. सर्व मालाची अंदाजित किंमत ६९ हजार ८३२ इतकी आहे. ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जामिर शेख, धुळे विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस. एस. मोरे, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांच्या नेतृत्वात रेंज स्टाफ वनपाल आर. एस. मोरे, के. एल. धनगर, एस.…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ‘श्यामची आई’ पुस्तकाचा १३ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. तसेच त्याचा जपानी, चीनी व इंग्रजीत अनुवाद केला आहे. त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांचे अनुवाद झाले पाहिजे. याकरीता प्रकाशकांनी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा साने गुरूजी यांची पुतणी सुधा साने यांनी व्यक्त केली. साने गुरूजींचे १२५ जन्म शताब्धी वर्ष आहे. त्यांच्या साहित्यांची खुप गरज आहे. येणाऱ्या काळात महामंडळाने यासंदर्भात उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. गुरूजींच्या मृत्यूला ७५ वर्ष पूर्ण होत आली आहेत. परंतु, आजही खान्देशाच्या मातीत त्यांचा प्रेमाचा दरवळ असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी साने गुरूजी यांच्या पुतणी सुधा साने यांचा लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लूप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्व प्रथम बोली भाषांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, असा सूर खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) परिसंवादात उमटला. कविवर्य ना.धो.महानोर सभागृह, सभामंडप क्रमांक २ मध्ये पार पडलेल्या खान्देशी बोलीभाषा परिसंवादात डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) – कन्नड, अशोक कौतिक कोळी (तावडी) – जामनेर, डॉ. पुष्पा गावीत – (भिल्ली) – धुळे, डॉ. जतीनकुमार मेढे (लेवा गणबोली) भालोद डॉ. सविता पटेल – (गुर्जर) – नंदुरबार यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी डॉ. रमेश सूर्यवंशी होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले. डॉ.सविता…
साईमत, अमळनेर : प्रतिनिध जगात सर्वच धर्मात जातीय तेढ विषमता वाढविण्याचा भांडवलशाही पुरस्कृत वाद सुरू आहे. युद्ध आणि संघर्ष यातून कोणतेही समाधान होवू शकत नाही. ही महाभारताची शिकवण लक्षात ठेवण्यासारखी आहे. प्रेमाचा धर्म हाच खरा धर्म आहे. साने गुरुजींच्या या भूमीत प्रेम धर्माविषयी बोलतांना आनंद होत असल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रहमान अब्बास यांनी व्यक्त केले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांनी कॉ.शरद पाटील मुख्य मंचावर अध्यक्षीय भाषणात सांगितले की, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सांगत बलसागर हो भारताची स्वप्न पाहणारे साने गुरुजींचे व्यक्तिमत्व म्हणजे शांती व क्रांतीचे अद्भुत मिश्रण असलेली आहे. निर्मिती ही नुसती साहित्यिकांची कल्पना सृष्टी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील १८ वे विद्रोही साहित्य संमेलनाची सामाजिक सांस्कृतिक यात्रेची जल्लोषपूर्ण सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, किशोर ढमाले, संयोजक करीम सालार, लीना राम पवार, अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम, बापूराव ठाकरे अमळनेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक सीमा रगडे, ज्योती भावसार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी वेशभूषेसह विशेष सहभाग नोंदविला. अमळनेरमधील सरस्वती विद्यामंदिर, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी विद्यामंदिर,…
साईमत, यावल : प्रतिनिधी यावल-भुसावळ रस्त्यावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदीच्या पुलावर चारचाकी वाहनाने २ मोटरसायकलींना धडक दिल्याने झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना गेल्या १ फेब्रुवारी २०२४ रोजी घडली होती.जबर जखमी झालेल्या बालकावर रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी बालकाचा मृतदेह ताब्यास घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी मयत मुलाच्या नातेवाईकांची समजूत घालून लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन देऊन समजूत घातली. सविस्तर असे की, यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळच्या मोर नदी पुलावर १ फेब्रुवारी २०२४…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी जिल्हा दूध संघ अथवा कृषी उद्योग विकास महामंडळात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन तब्बल साडे तेरा लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजकीय कनेक्शन मिरविणाऱ्या तरूणाला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरी येथील रहिवासी फकीरा अर्जुन सावकारे (वय २५) या तरूणाने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. त्यात नमूद केले आहे की, या तरूणाने बारावी आणि आयटीआय फिटर हा कोर्स पूर्ण केला आहे. त्यानंतर त्याची जळगाव येथील प्रमोद शांताराम सावदेकर यांच्याशी ओळख झाली. सावदेकरांनी आपण कृषी उद्योग विकास महामंडळात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे सांगत आपल्या खूप राजकीय…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधाबाई परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोणवाडी येथील माजी सरपंच शिलाबाई सुरेश पाटील यांचे एक महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात लोणवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचा पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे उपसरपंच आणि सदस्य यांच्या संयुक्त विचाराने सरपंच पदासाठी विशेष सभा घेण्याचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व सदस्यांना सभेच्या नोटीसा देण्यात आल्या. सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी राधाबाई नारायण परदेशी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल सरोदे यांनी राधाबाई परदेशी यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले. लोणवाडी गावातील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे जळगाव जिल्हा परदेशी राजपूत…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यात हवालदार पदावरून सहाय्यक फौजदारपदी अरविंद मोरे यांना बढती मिळाली तर पोलीस नाईक पदावरून हवालदार पदावर अरुण राजपूत यांना बढती मिळाली आहे. यावेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे आणि महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या हस्ते फित लावून दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. दोघांच्या पदोन्नतीमुळे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे आणि हवालदार अरुण राजपूत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच उत्साहात पार पडले. उद्घाटक म्हणून योगेश गणगे होते. अध्यक्षस्थानी प्रा.सुभाष पोतला (चेअरमन, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती, पाचोरा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संचालक खलील देशमुख, संचालक दुष्यंत रावल उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. त्यात गीत गायन स्पर्धा, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, नाटीका, मिमिक्री, फॅन्सी ड्रेस यासारखे कलाप्रकार सादर करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदार संघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ…