लोणवाडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी राधाबाई परदेशी बिनविरोध

0
4

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधाबाई परदेशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लोणवाडी येथील माजी सरपंच शिलाबाई सुरेश पाटील यांचे एक महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पश्‍चात लोणवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचा पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे उपसरपंच आणि सदस्य यांच्या संयुक्त विचाराने सरपंच पदासाठी विशेष सभा घेण्याचे आयोजन करण्यात आले. तसेच सर्व सदस्यांना सभेच्या नोटीसा देण्यात आल्या. सरपंच पदाच्या उमेदवारीसाठी राधाबाई नारायण परदेशी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल सरोदे यांनी राधाबाई परदेशी यांची सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले.

लोणवाडी गावातील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे जळगाव जिल्हा परदेशी राजपूत समाजाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी यांच्या हस्ते सरपंच राधाबाई परदेशी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मंगलसिंग परदेशी, कोषाध्यक्ष अण्णा कायटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here