पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाऱ्यांची पदोन्नती

0
25

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यात हवालदार पदावरून सहाय्यक फौजदारपदी अरविंद मोरे यांना बढती मिळाली तर पोलीस नाईक पदावरून हवालदार पदावर अरुण राजपूत यांना बढती मिळाली आहे.

यावेळी पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे आणि महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या हस्ते फित लावून दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपळगाव हरेश्‍वर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. दोघांच्या पदोन्नतीमुळे सहाय्यक फौजदार अरविंद मोरे आणि हवालदार अरुण राजपूत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here