विद्रोही साहित्य संमेलनाची सामाजिक, सांस्कृतिक संविधान यात्रेची जल्लोषपूर्ण सुरुवात

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील १८ वे विद्रोही साहित्य संमेलनाची सामाजिक सांस्कृतिक यात्रेची जल्लोषपूर्ण सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्‍याम पाटील, राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, किशोर ढमाले, संयोजक करीम सालार, लीना राम पवार, अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम, बापूराव ठाकरे अमळनेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यवस्थापक सीमा रगडे, ज्योती भावसार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी वेशभूषेसह विशेष सहभाग नोंदविला. अमळनेरमधील सरस्वती विद्यामंदिर, शांतीनिकेतन प्राथमिक विद्यामंदिर, जय योगेश्‍वर माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी विद्यामंदिर, उर्दू कन्या शाळा, समाज कार्य महाविद्यालय सोबतच अमळनेरचे सर्व रसिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रॅलीत चित्ररथावर संविधान प्रत होती. तसेच सहभागी वेशभूषाधारी, बापूराव ठाकरे, पूनम ठाकरे हे दाम्पत्य मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले. गाडगे महाराजांची वेशभूषा केलेले एक वयोवृद्ध आकर्षक होते. घोड्यावर बाल शिवबा, मॉ साहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या बालिका होत्या. मेघा पाटील व विद्यार्थी यांचे उत्कृष्ट लेझीम पथक, वैशाली पाटील व विद्यार्थ्यांचे काठी पथक, अनिता संदानशिव रमाई ढोलपथक तसेच एक आर्मी जिप, संबळ नृत्य, नंदीबैल नृत्य, जोगवा, भजन मंडळ, वारकरी पथक तसेच दहिवद गावाच्या वृक्ष लागवडीच्या मनरेगाच्या महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण व ऊर्जामुळे अशा सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या लेकी, छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबासारख्या अनेक महामानवांच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे, विद्रोही तोफसह लक्षवेधी ठरली. संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत यात्रेचे उद्घाटन केले.

सांस्कृतिक विचार यात्रा यशस्वी करण्यासाठी दहिवद गावाचे देवानंद बहारे, उपसरपंच शिवाजी पारधी, सदस्य वैशाली गोसावी, योगिता गोसावी यांच्या सहकार्याने महिलांना सहभागी होता आले. यासाठी गावातील समस्त नागरिकांचा सहभाग दिसून आला. दिंडीचे आरती पाटील, वैशाली शेवाळे, प्राचार्य डॉ.पी.एस.पाटील आयोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here