सत्रासेनला साठविलेले अवैध सागवानचे लाकुड जप्त

0
1

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील वनक्षेत्रपाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन शुक्रवारी, २ फेबु्रवारी २०२४ रोजी सत्रासेन गावाच्या पश्‍चिम दिशेला असलेल्या एक कौलारु घरात मुद्देमाल असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तेथील पोलीस पाटील यांना सोबत घेऊन छापा टाकून झडती घेतली. छाप्यात साग चौपट नग-(पलंग सह)-५३, घ. मी.०.४०१ इलेक्ट्रिक कटर मशिन नग-०१, इतर साहित्य आढळून आले. सर्व मालाची अंदाजित किंमत ६९ हजार ८३२ इतकी आहे.

ही कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जामिर शेख, धुळे विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस. एस. मोरे, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांच्या नेतृत्वात रेंज स्टाफ वनपाल आर. एस. मोरे, के. एल. धनगर, एस. एम. पावरा, एम. बी. पाटील, वनरक्षक एस. के. कंखरे, सीमा भालेराव, रिला पावरा, रोहित पावरा, प्रवीण बागुल, सोनाली बारेला, विजया पावरा, सुरेखा सोनवणे, अमोल पाटील, शुभम पाटील, सरला भोई, वाहन चालक गोविंदा चौधरी, मदन मराठे आदींचे पथक व परिमंडळ सत्रासेन, उमर्टी, लासुर येथील कायम व रोजंदारी वनमजुर यांच्या मदतीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here