Author: Sharad Bhalerao

साईमत, यावल : प्रतिनिधी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कुलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी अशोक जामकर (भूमी अभिलेख यावल) होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, शाळा सदस्य शशिकांत फेगडे, दीपक महाजन, सारीका वाणी (पोलीस नाईक), पर्यवेक्षक म्हणून फैजपूर येथील नृत्यशिक्षिका शोभा लोधी, नितीन कोळी आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीत सादर करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांपासून इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच विविध प्रकारच्या वेशभूषा साकारल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांनी…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यात ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. अद्यापही बहुतांश ठिकाणी शिधा वाटप सुरू आहे. आनंदाचा शिधा वाटप थैलीवर सुंदर आकर्षक लक्षवेधी श्रीरामाचे चित्र आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असल्याने अनेक लाभार्थ्यांनी ‘जय श्रीराम’, ‘श्री छत्रपती महाराज की जय’ असे म्हणत पोषक असा ‘आनंदाचा शिधा’ स्वीकारत आहे. राज्याच्या मंत्री मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जाणार आहे. म्हणून या दिवशी महाराष्ट्रात रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुक्ताईनगरला अखेर तहसीलदार म्हणून गिरीश वखारे यांची नियुक्ती राज्य शासनाच्या महसूल विभागाने गुरुवारी, १५ फेब्रुवारी रोजी अध्यादेश काढून केलेली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाच्या महसूल विभागाने केलेल्या आहे. त्यात श्री.वखारे यांचाही समावेश आहे. गिरीश वखारे हे सध्या तळोदा तहसील कार्यालय, जि.नंदुरबार येथे कार्यरत होते. गेल्या आठ महिन्यात मुक्ताईनगरचे तहसीलदार श्री.वखारे हे चवथे तहसीलदार म्हणून नियुक्त होणार आहेत. १२ जून २०२३ रोजी मुक्ताईनगरच्या तत्कालीन तहसीलदार श्‍वेता संचेती यांची बदली त्र्यंबकेश्‍वर, जि.नाशिक येथे झाल्यानंतर येथील तहसिलदारांचे पद रिक्त होते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी दीड ब्रासची अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सुसाट वेगाने पळून जात असताना यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी सिनेस्टाईल पद्धतीने हिंगोणा येथे पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले. दरम्यान, यावल शहरात दिवसा, रात्री बे-रात्री, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी दैनंदिन कामकाजात व्यस्त असतात. यावल शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहे. मात्र, दुसरीकडे अवैध गौण खनिजची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिजची वाहतूक करणारे डंपर (क्र. एमएच ३१ सीक्यू ७९१४) तालुक्यातील हिंगोणा येथे पकडून यावल तहसील कार्यालयात…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात अहवाल लेखन, वृत्तांत लेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन शिकविले जाते. मात्र, त्याची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती अर्थात प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत नाही. हा अनुभव यावा, या उद्देशाने येथे नुकत्याच झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी केलेल्या अहवाल लेखन संकलनाची दखल घेऊन दहावीच्या विद्यार्थिनींना बोर्डाच्या परीक्षेत शाळांतर्गत भाषेच्या तोंडी परीक्षेत १५ गुण तर बारावीच्या विद्यार्थिनींना दहा गुण दिले जाणार आहेत. अशा आगळ्यावेगळ्या शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या प्राचार्या गायत्री भदाणे यांनी…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी विश्‍वास संपादन करून सामाजिक कार्य करीत राहणे हाच खरा धर्म आणि खरी तप साधना आहे, असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. ते फैजपूर येथील श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञता महोत्सवात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कार्यक्रमाचा प्रारंभ प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.रक्षा खडसे, माजी आमदार रमेश चौधरी, अरुण पाटील, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटक दिलीप पाटील, शरद महाजन, रवींद्र महाराज हरणे यांनी उपस्थित राहून मनोगतात संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सहकार क्षेत्रात गेली ३० वर्षे यशस्वीपणे कार्य करीत असल्याबाबत…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे समाजातील कर्तृत्ववान अधिकारी आणि समाजासाठी भूषणीय कार्य करणाऱ्या सहा कर्तृत्ववान मान्यवरांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी दिली. ‘समाज भूषण पुरस्कार’ दिल्या जाणाऱ्या सहा कर्तृत्ववान पुरस्कारार्थींमध्ये नाशिकला सेवा देणारे मूळ कुऱ्हाड, ता.पाचोरा येथील रहिवासी पोटाचे विकार, लिव्हर स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉ.शरद अण्णा देशमुख,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत शिवसेना नेते उमेश (पप्पूदादा) गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी असंख्य शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील, गुणवंत शेलार, संजीव पाटील, सागर चौधरी, शुभम राठोड, साहेबराव काळे मनीषा महाजन, अनिता शिंदे, सुवर्णा राजपूत, कविता साळवे, सीमा पवार, रत्ना पाटील, सागर पाटील, महेंद्र पाटील, विशाल धनगर, दीपक बारी, दिनेश कासार उपस्थित होते. यावेळी सोमा चौधरी, त्रिशुल गोसावी, अजय पाखरे, महेंद्र मसाळे, रोहित शिरसाट, रोहित पाटील, भूषण चौधरी, पवन चौधरी, गौरव चौधरी, प्रथमेश चौधरी, उज्ज्वल बाविस्कर, प्रमोद देशमुख, सुमित चौधरी, शैलेश बाविस्कर, विशाल कुमावत, आशुतोष पाटील,…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे आपल्या गावी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू आहे. ‘सगे सोयरे’ यांची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी उपोषण सुरू आहे. मात्र, त्यांची तब्येत खूपच खालावली आहे. त्यांच्या नाकातूनही रक्त वाहत असल्याचे फोटो व व्हिडिओ प्रसारित होत आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, त्या प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यामुळे ती व्हावी, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून जामनेरातील सकल मराठा समाजाच्या भावना व समर्थन ह्या सरकारपर्यंत पोहचाव्या, यासाठी शनिवारी, १७…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने नवीन नाव दिल्यानंतर जामनेर तालुक्यात तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. नवीन नियुक्तीसाठी शनिवारी, १७ फेबु्रवारी रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर शहरात बैठक आयोजित केली होती. त्यात तालुकाध्यक्ष पदासाठी किशोर पाटील यांच्या नावाला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमुखाने अनुमोदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते किशोर पाटील यांचा सत्कार करुन जामनेर तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षाच्या संघर्षाच्या काळात पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून किशोर पाटील यांनी वेळोवेळी भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात आंदोलन केले आहे. तालुक्यातील नागरिकांचे पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि…

Read More