जामनेरात जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

गेल्या सात दिवसांपासून मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे आपल्या गावी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचा हा लढा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू आहे. ‘सगे सोयरे’ यांची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी उपोषण सुरू आहे. मात्र, त्यांची तब्येत खूपच खालावली आहे. त्यांच्या नाकातूनही रक्त वाहत असल्याचे फोटो व व्हिडिओ प्रसारित होत आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, त्या प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्यामुळे ती व्हावी, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून जामनेरातील सकल मराठा समाजाच्या भावना व समर्थन ह्या सरकारपर्यंत पोहचाव्या, यासाठी शनिवारी, १७ फेबु्रवारी रोजी एकदिवसीय उपोषण करण्यात आले. सरकारने मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी लक्षात घेऊन तात्काळ त्यांच्या मागण्यांचा विचार करून अंमलबजावणी सुरू करावी. अन्यथा सकल मराठा समाज येत्या काळात मैदानात उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर यांना जामनेरातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

उपोषणस्थळी उपोषणकर्ते युवा तालुकाध्यक्ष अशोक पाटील, डॉ.मनोहर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, ॲड ज्ञानेश्‍वर बोरसे, नानासाहेब पाटील, विश्‍वजित पाटील, सागर पाटील, आकाश बंडे, प्रल्हाद बोरसे, किशोर पाटील,विनोद पाटील, नरेंद्र जंजाळ, प्रफुल्ल पाटील, विलास पाटील, तुकाराम गोपाळ, गौरव पाटील, हिसमुद्दीन शेख, समाधान शेळके, विनोद बाविस्कर, दीपक पाटील, शिवाजी शिंदे, मारुती चीकने, सचिन सोनवणे, अविनाश वाघ, अविनाश बोरसे, अजय चौधरी, अमोल पाटील, प्रदीप गायके, रुपेश पाटील, पुंडलिक पाटील, आण्णा पाटील, उत्तमराव पाटील, काशिनाथ तायडे, भूषण कांनडजे, योगेश पाटील, प्रदीप पाटील, ईश्‍वर पाटील, स्नेहदिप गरुड, गोविंदा बनकर, राहुल मुळे, दशरथ पाटील, मयूर पाटील, रामदास पवार आदी समाजसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here