यावल तालुक्यात ‘आनंदाचा शिधा’चे लाभार्थ्यांना वाटप

0
2

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यात ‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. अद्यापही बहुतांश ठिकाणी शिधा वाटप सुरू आहे. आनंदाचा शिधा वाटप थैलीवर सुंदर आकर्षक लक्षवेधी श्रीरामाचे चित्र आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असल्याने अनेक लाभार्थ्यांनी ‘जय श्रीराम’, ‘श्री छत्रपती महाराज की जय’ असे म्हणत पोषक असा ‘आनंदाचा शिधा’ स्वीकारत आहे. राज्याच्या मंत्री मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात हा दिवस दिवाळी म्हणून साजरा केला जाणार आहे. म्हणून या दिवशी महाराष्ट्रात रेशनकार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या १० जानेवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. श्रीराम जन्मभूमी सोहळा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ६ वस्तू मिळणार आहे. हे सर्व ‘आनंदाचा शिधा’द्वारे दिला जात आहे.
गेल्या १० जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय झाले. त्यापैकी एक म्हणजे श्रीराम जन्मभूमी सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप. हा आनंदाचा शिधा २२ जानेवारी २०२४ पासून सर्व पात्र (पांढरे व केशरी कार्डधारक वगळता) रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे. ‘आनंदाचा शिधा’त चनाडाळ, रवा, साखर, खाद्यतेल, मैदा आणि पोहे अशा ६ वस्तु असणार आहे. राज्यातील १.६८ कोटी रेशन कार्ड धारकांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे. त्याचे वाटप अद्यापही सुरु आहे.

कोणाला मिळणार ‘आनंदाचा शिधा’

राज्यातील अंत्योदय योजना कुटुंबे, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच इतर धारक यांना ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे. बरेच काही जण श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने विरोध करणारे होते. परंतु केंद्र व राज्य सरकारच्या निर्णयामुळे ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येत आहे. त्यावर लक्षवेधी श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक छायाचित्र असल्याने अनेक लाभार्थी ‘जय श्रीराम’, ‘जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणत आनंदाचा पोषक असा शिधा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपल्या घरी घेऊन जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here