जामनेरला अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे सहा जणांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीर

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

येथील अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे समाजातील कर्तृत्ववान अधिकारी आणि समाजासाठी भूषणीय कार्य करणाऱ्या सहा कर्तृत्ववान मान्यवरांना ‘समाज भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारार्थींना मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांची उपस्थिती लाभणार आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांनी दिली.

‘समाज भूषण पुरस्कार’ दिल्या जाणाऱ्या सहा कर्तृत्ववान पुरस्कारार्थींमध्ये नाशिकला सेवा देणारे मूळ कुऱ्हाड, ता.पाचोरा येथील रहिवासी पोटाचे विकार, लिव्हर स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉ.शरद अण्णा देशमुख, नाशिकला कार्यरत मूळ कुऱ्हाड, ता.पाचोरा येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुचिता देशमुख, मुंबईला कर्तव्य बजावणारे मूळ गोंधनखेड येथील पोलीस निरीक्षक निवृत्ती भीमराव बोराडे, मुंबईला कार्यरत मूळ पहूरचे रहिवासी पोलीस निरीक्षक शिव काशिनाथ पांढरे, जळगावला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत तथा मूळ रोटवदचे रहिवासी अमोल कडुबा देशमुख, नाशिकला कर्तुत्व बजावणारे मूळ लोहारा येथील रहिवासी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.राजेंद्र देशमुख यांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थींना लवकरच एका आयोजित केल्या जाणाऱ्या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here